GST Car Price 2025 नवरात्रीत कार खरेदी करणार? जीएसटी बदलामुळे मिळणार थेट लाखोंचा फायदा!

Spread the love

नवरात्री आणि दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात बहुतांश लोक नवीन घर, दागिने किंवा वाहन घेण्याचा विचार करतात. यंदा मात्र कार खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठी खुशखबर दिली आहे.

सरकारने वस्तू आणि सेवा कर (GST) मध्ये मोठा बदल केला आहे. आतापर्यंत कारवर चार वेगवेगळे कर स्लॅब होते; मात्र आता ते दोनच स्तरांवर आणले आहेत. २२ सप्टेंबरपासून हा नवा दर लागू होणार आहे.

लहान कारवर पूर्वी २८% जीएसटी आकारला जात होता. आता तो थेट १८% करण्यात आला आहे.

आलिशान कारसाठी करदर ४०% राहणार आहे.

इलेक्ट्रिक वाहनांवर मात्र पूर्वीसारखाच ५% जीएसटी आकारला जाणार आहे.

या बदलामुळे कार खरेदी सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी ठरणार आहे. अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी जीएसटी कपातीचा फायदा ग्राहकांना द्यायला सुरुवात केली आहे, तर काही कंपन्या २२ तारखेपासून नवीन दर लागू करणार आहेत.

महिंद्राचा मोठा लाभ

महिंद्राने आपल्या लोकप्रिय गाड्यांच्या किंमती मोठ्या प्रमाणात कमी केल्या आहेत. बोलेरो आणि निओ मॉडेल्स तब्बल १.२७ लाख रुपयांनी स्वस्त झाले आहेत.

थर 2WD – १.३५ लाखांनी कमी

थर 4WD – १.०१ लाखांनी कमी

स्कॉर्पिओ क्लासिक – १.०१ लाखांनी कमी

स्कॉर्पिओ N – १.४५ लाखांनी कमी

रेनॉचा जाहीर कट

रेनॉ कंपनीने ग्राहकांसाठी जवळपास एक लाख रुपयांची कपात जाहीर केली आहे.

कायगर Emotion CVT-I LT – आता किंमत १०.३३ लाख (पूर्वी ११.२९ लाख)

क्विड Climber AMT – आता ५.९० लाख (पूर्वी ६.४४ लाख)

टाटा मोटर्सची ऑफर

टाटा मोटर्सने २२ सप्टेंबरपासून नवीन दर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. अंदाजे किंमत कपात अशी –

टियागो – ७५ हजारांनी कमी

टिगोर – ८० हजारांनी कमी

अल्ट्रोझ – १.१० लाखांनी कमी

पंच – ८५ हजारांनी कमी

नेक्सॉन – १.५५ लाखांनी कमी

कर्व्ह – ६५ हजारांनी कमी

हॅरिअर – १.४४ लाखांनी कमी

सफारी – १.४५ लाखांनी कमी

निसानची मॅग्नाइट स्वस्त

निसान मोटर इंडियाने कॉम्पॅक्ट SUV मॅग्नाइट च्या किंमतीत १ लाख रुपयांपर्यंत कपात केली आहे. हा लाभ २२ सप्टेंबरपासून म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून लागू होईल.

किया इंडियाचा सर्वात मोठा धडाका

किया इंडियाने आपल्या कार्सवर ४.४८ लाख रुपयांपर्यंत किंमत कपात जाहीर केली आहे.

कॅरेन्सवर सुमारे ४८ हजारांची कपात

कार्निव्हलवर तब्बल ४.४८ लाखांची कपात

ही नवीन किंमत कपातदेखील २२ सप्टेंबरपासून लागू होईल.

सामान्य ग्राहकांसाठी ‘सुवर्णसंधी’

सरकारच्या या निर्णयामुळे सणासुदीच्या मुहूर्तावर कार खरेदी करणे अनेक कुटुंबांसाठी सोपे होणार आहे. कमी झालेल्या करामुळे केवळ कंपन्यांचाच फायदा नाही, तर थेट ग्राहकांच्या खिशात लाखोंची बचत होणार आहे.

म्हणजेच यंदाच्या नवरात्रीत ‘लक्ष्मी’ खरोखरच चारचाकीच्या रूपाने तुमच्या घराच्या दारी येऊ शकते.

One thought on “GST Car Price 2025 नवरात्रीत कार खरेदी करणार? जीएसटी बदलामुळे मिळणार थेट लाखोंचा फायदा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *