Agriculture News : 28 साखर कारखान्यांना थेट आरआरसी कारवाई; शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये अजूनही थकीत

Spread the love

Maharashtra Sugar Factory महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब ठरत चाललेली थकीत एफआरपीची समस्या अजूनही सुटण्याचे नाव घेत नाही. राज्यातील तब्बल 54 साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे सुमारे 304 कोटी रुपयांचे पैसे थकवले असून, त्यापैकी 28 कारखान्यांवर थेट आरआरसी (Revenue Recovery Certificate) कारवाई सुरू करण्यात आली आहे.

सोलापूर जिल्हा ठरला सर्वात मोठा थकबाकीदार

साखर आयुक्तांनी कारवाई केलेल्या कारखान्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 15 कारखाने सामाविष्ट आहेत. धाराशिवमधील एक कारखान्यावरदेखील कारवाई झाली आहे.
ऑगस्ट अखेरपर्यंत फक्त सोलापूर जिल्ह्यातील आठ कारखान्यांकडे ४२ कोटी १६ लाख रुपये शेतकऱ्यांचे थकबाकी स्वरूपात आहेत. यामध्ये सिद्धेश्वर साखर कारखान्याची तब्बल १८ कोटी रुपयांची थकबाकी असून, तो सर्वात मोठा थकबाकीदार ठरला आहे.

  • थकबाकीदार कारखान्यांची यादी
  • मातोश्री लक्ष्मी शुगर (अक्कलकोट)
  • गोकुळ शुगर (धोत्री)
  • जय हिंद शुगर (आचेगाव)
  • सिद्धनाथ शुगर (तिर्हे)
  • इंद्रेश्वर शुगर (बार्शी)
  • सिद्धेश्वर शुगर (सोलापूर)
  • लोकमंगल गटाचे बीबीदारफळ व भंडारकवठे कारखाने
  • भैरवनाथ शुगर (आलेगाव व लवंगी)
  • भीमा सहकारी (टाकळी सिकंदर)
  • धाराशिव शुगर (सांगोला)
  • स्वामी समर्थ शुगर (नेवासा)
  • गजानन महाराज शुगर (संगमनेर)
  • गंगामाई इंडस्ट्रीज (शेवगाव)
  • केदारेश्वर सहकारी (शेवगाव)
  • किसनवीर सहकारी (सातारा)
  • खंडाळा तालुका साखर कारखाना
  • जय महेश (माजलगाव)
  • कर्मयोगी शंकरराव पाटील (इंदापूर)
  • समृद्धी शुगर (घनसांगवी)
  • डेक्कन शुगर (यवतमाळ)
  • पैनगंगा साखर कारखाना (बुलढाणा)

शेतकऱ्यांची अडचण कायम

साखर हंगाम अवघ्या काही दिवसांवर आला असतानाही मागील हंगामाचे पैसे शेतकऱ्यांना अजून मिळालेले नाहीत. खत, बियाणे, मजुरी यांसारख्या खर्चासाठी लागणारा निधी थकित राहिल्याने शेतकऱ्यांना पुन्हा कर्जाकडे वळावे लागत आहे. अनेक कारखाने वेळेवर पैसे न देण्याची सवयच जणू अंगवळणी पडली आहे.

शेतकऱ्यांचा रोष आणि प्रश्नचिन्हे

सरकारने कारवाईचा बडगा उगारून आरआरसीची नोटीस दिली असली, तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात पैसे कधी पोहोचतील, हा मोठा प्रश्नचिन्ह कायम आहे. शेतकऱ्यांनी घाम गाळून तयार केलेल्या ऊसाचे पैसे वेळेवर मिळाले नाहीत, तर त्यांच्या पुढच्या हंगामावर थेट परिणाम होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *