महानगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजला असून येत्या 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून सर्वच प्रमुख पक्ष तयारीला लागले आहेत.

शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची युती जाहीर झाली आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातही युतीबाबत चर्चा सुरू आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट एकत्र निवडणूक लढवणार का, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने महानगरपालिका निवडणुकांसाठी आपल्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
सुनिल तटकरे यांनी जाहीर केली यादी
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी ही यादी जाहीर केली आहे. या यादीत अनुभवी नेत्यांसह युवा नेतृत्वालाही संधी देण्यात आली असून, निवडणूक प्रचारासाठी संपूर्ण ताकद मैदानात उतरवण्याची रणनीती आखण्यात आली आहे.
स्टार प्रचारकांच्या यादीत कोणाचा समावेश?
- जाहीर करण्यात आलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत
- उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार,
- राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल,
- प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे,
- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ,
- माजी मंत्री धनंजय मुंडे,
- अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ,
- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील,
- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील,
- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे,
- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे,
- महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे,
- पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक,
- माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, अनिल भाईदास पाटील, संजय बनसोडे,
- ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक,
- आमदार अमोल मिटकरी, सना मलिक-शेख,
- महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर,
- आमदार इद्रीस नायकवडी,
- माजी आमदार झिशान सिद्दीकी, राजेंद्र जैन,
- मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे,
- प्रदेश सरचिटणीस सूरज चव्हाण,
- ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे,
- अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष नाझेर काझी,
- प्रदेश प्रवक्ते महेश शिंदे
- यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे.
- प्रचाराला मिळणार वेग
- महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या स्टार प्रचारकांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आक्रमक प्रचार करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील राजकीय समीकरणे पाहता, येत्या काही दिवसांत प्रचाराचा रंग चढण्याची शक्यता आहे.
Do you have a spam problem on this website; I also am a blogger, and I
was curious about your situation; many of us have developed some nice methods
and we are looking to exchange solutions with other folks,
why not shoot me an e-mail if interested.