भारतातील गुजरातमध्ये पहिल्या EV उत्पादन सुरू होणार
Maruti Suzuki ची गगनभरारी – Hansalpur प्लांटमध्ये ‘e Vitara’ SUV चे उत्पादन सुरू
हंसलपूर (गुजरात)
जपानची सुझुकी कंपनी भारतामध्ये जवळपास सगळ्यात जास्त विक्री होणारी गाडी आहे त्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं गेलं तर मेंटेनन्स फ्री आणि सर्वसामान्यांच्या खिशाला झळ न लागणारी गाडी म्हणजे ती सुझुकी असं देखील म्हटले जाते त्याचबरोबर आघाडीची वाहन निर्माता कंपनी सुजुकी मोटर (Suzuki Motor) भारतामध्ये एकूण तब्बल ७० हजार कोटी रुपये (८ अब्ज डॉलर्स) एवढी प्रचंड मोठी गुंतवणूक करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. येणाऱ्या पाच ते सहा वर्षांच्या कालावधीत ही गुंतवणूक करणार असून, गुजरातमधील हंसलपूर येथे कंपनीच्या पहिल्या इलेक्ट्रिक वाहनाच्या उत्पादनाला देखील सुरुवात झालेली आहे.

- Weather Alert: या जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता ; 24 जिल्ह्यांना अलर्ट
- Central Government Alert केंद्रा कडून ; सर्व राज्यांना पत्र 20 दिवसांत ॲक्शन प्लॅन तयार करण्याचे आदेश
- ZP Election जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर ; कोणत्या जिल्ह्याला कोणतं आरक्षण?
- Weight Lose सकाळी करा ही ५ कामे; पोटाची चरबी कमी होईल
- Nano Banana AI वापरून काही मिनिटांत 3D फोटो कसा बनवायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
भारत – सुजुकीसाठी जागतिक EV उत्पादन केंद्र होणार
सुजुकी मोटरकडे भारतातील मारुती सुजुकी (Maruti Suzuki) या सर्वात मोठ्या कार कंपनीत बहुसंख्य हिस्सा आहे. सध्या मारुती सुजुकी भारतात १७ मॉडेल्स तयार करणार आहे त्यामध्ये जगातील सुमारे १०० देशांमध्ये निर्यात करते. आता या यादीत इलेक्ट्रिक कार्सचाही समावेश झालेला आहे.
“भारत हे सुजुकीसाठी जागतिक EV उत्पादन केंद्र बनेल,” असे सुजुकी मोटरचे चेअरमन तोशिहिरो सुजुकी यांनी सांगितले.
‘ई-विटारा’ SUV चे उत्पादन सुरू
गुजरात मधील हंसलपुर या प्लांटमध्ये विटारा विटारा या गाडीचे मॅन्युफॅक्चरिंग हे चालू झालेले आहे ही मध्यम आकाराची SUV असून जागतिक बाजारपेठेसाठी निर्यात केली जाणार आहे.
मारुती सुजुकीचे चेअरमन आर.सी. भार्गव यांनी सांगितले की दरवर्षी ५० हजार ते १ लाख EV गाड्या भारतातून निर्यात केल्या जातील. मात्र, भारतातील ग्राहकांसाठी या कारची विक्री सुरू होण्यास अद्याप वेळ आहे, कारण बॅटरीचा खर्च अजूनही जास्त असल्यामुळे भारतीय बाजारात किंमत परवडणारी ठेवणे कठीण आहे.

शेअर बाजारात मारुती सुजुकीची गगन भरारी
गुंतवणुकीच्या या घोषणेनंतर मारुती सुजुकीच्या शेअरला जबरदस्त उच्चांकी गाठली आहे सुझुकीचा शेअर तब्बल २.६% नी वाढून सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला.
प्रतिस्पर्ध्यांना टक्कर
‘e Vitara’ SUV ही गाडी भारतामध्ये होंडाई क्रेटा आणि महेंद्रा या कंपनीची एक्सइव्ही नाईन या गाडीची स्पर्धा करू शकते.
भारतातील EV बाजारपेठ
भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची विक्री हळूहळू वाढत आहे. एप्रिलपासून सुरू झालेल्या या आर्थिक वर्षात आतापर्यंत विकल्या गेलेल्या सर्व गाड्यांपैकी ४.५% गाड्या इलेक्ट्रिक आहेत. केंद्र सरकारने २०३० पर्यंत हा आकडा ३०% पर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
गुजरात – जगातील सर्वात मोठं वाहन उत्पादन केंद्र
गुजरात मधील हंसलपूर येथील सुजुकी च्या प्लांट मध्ये आगामी काळात जगातील सर्वात मोठ्या वाहन उत्पादन केंद्रांपैकी एक ठरणार आहे. कंपनीने येथे दरवर्षी १० लाख युनिट्स तयार करण्याचे ध्येय ठेवले आहे.
या भव्य कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. त्यांनी या प्रकल्पाला ‘मेक इन इंडिया’ अभियानाकडे मोठं पाऊल असल्याचं म्हटलं. तसेच लोकांनी भारतात तयार झालेली उत्पादने खरेदी करावीत, मग ती कोणत्याही देशाच्या गुंतवणुकीतून आली असली तरी, असे आवाहनही त्यांनी केले.
सुझुकी मोटरच्या या ८ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीमुळे भारत केवळ पारंपरिक वाहन उत्पादनातच नाही तर इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातही जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल करत आहे. गुजरातमधील हा प्लांट पुढील काही वर्षांत केवळ भारतासाठीच नव्हे तर जगासाठी इलेक्ट्रिक गाड्यांचा मोठा पुरवठादार ठरणार आहे.