दुधाला भाव द्या म्हणत खा.सोनवणे झाले आक्रमक

Spread the love

संसदेसमोर आंदोलन, दूध अनुदान पुन्हा सुरू करण्याचीही मागणी

बीड:
महाराष्ट्र राज्यातील दूध उत्पादक शेतकरी त्यांच्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर सतत आंदोलन करीत आहेत, परंतु त्यांच्या मागण्यांकडे गांभिर्याने पाहिले जात नाही. यामुळे खा.बजरंग सोनवणे यांनी अनेक खासदारांना एकत्रित करत दि.१९ रोजी संसदेसमोरच आंदोलन केले.

राज्यात शेतकरी आणि दुध उत्पादक अडचणीत आहेत. दुधाला मिळणारा भाव आणि जनावरांवर होणारा खर्च याचा ताळमेळ बसायला तयार नाही. यामुळे दुध उत्पादकांना दुधाचा दर वाढून मिळावा, यासाठी बीडचे खा.बजरंग सोनवणे यांनी सहकारी खासदारांना एकत्रित करून दिल्ली येथे संसदभवन समोर आंदोलन केले. यावेळी गायी व म्हशीच्या दुधाला दर वाढऊन द्यावा, बंद केलेले दूध अनुदान पुन्हा सुरु करावा, दीर्घकालीन ‘दूध धोरण’ रचना करावी, अशी मागणी करण्यात आली. राज्यात विविध भागात दुध उत्पादकांचे आंदोलन सुरू आहे. त्यांच्या आंदोलनात सर्वसामान्य शेतकरी देखील सहभागी होत असून दि.१९ रोजी दुध उत्पादकांच्या आंदोलनाच्या समर्थनामधे संसदेच्या दारावर प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. यावेळी दूध उत्पादक शेतकऱ्यासमोरील आव्हाने कमी करणे व दुधाला दर मिळऊन देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे खा.बरजंग सोनवणे यांनी म्हटले. यावेळी खा.छत्रपती शाहू महाराज, खा.निलेश लंके आणि इतर खासदारांची उपस्थिती होती. खा.बजरंग सोनवणे हे शेती आणि शेतकऱ्यांच्या जोडव्यवसायावर लक्ष ठेवून आहेत. दुध उत्पादक अडचणीत सापडले म्हणून त्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतला होता.. दूध हे शेतकऱ्यांसाठी केवळ उत्पादन नसून जोडधंदा आणि जीवन जगण्याचा अविभाज्य घटक आहे. मात्र, आज दुधाला योग्य भाव मिळत नाही, उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने विक्री करावी लागत आहे. दुसरीकडे दुधात भेसळ करणारे लोक सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळ करत आहेत. या शेतकरी आणि ग्राहकांशी निगडित प्रश्नांवर इंडिया आघाडीच्या खासदारांनी मंगळवारी (दि.१९) संसद भवनासमोर आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *