हजयात्रा नोंदणी पहिला हप्ता भरण्यासाठी मुदतवाढ द्या: खा.सोनवणे

Spread the love

बीड/
पवित्र हज यात्रा-२०२६ नोंदणी संदर्भातील पहिला हप्ता भरण्याची अंतिम तारीख दि.३०ऑगस्ट पर्यंत वाढवावी, अशी मागणी खा.बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय अल्पसंख्यक मामले विभागाचे मंत्री किरेन रिजिजू यांची भेट घेऊन केली.

पत्रात म्हटले आहे, पवित्र हज यात्रेला महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव जात असतात. नोंदणीसंदर्भातील पहिला हप्ता भरण्यासाठी दि.२० ऑगस्टपर्यंतच मुदत देण्यात आलेली आहे. परंतु लॉटरी जाहीर झाल्यानंतर १५ ते १७ ऑगस्टपर्यंत बँकांच्या सलग सुट्ट्या आणि बॅंकांमधील तांत्रिक अडचणींमुळे हज साठी इच्छुक अनेक यात्रेकरुंना वेळेत रक्कम जमा करता आली नाही. हज यात्रेसाठी जाणाऱ्या नागरिकांची अडचण लक्षात घेणे आवश्यक असून त्यांना हजला जायचे असताना नोंदणी प्रक्रियेत अडचणी निर्माण होवू नयेत, यासाठी दि.३० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देणे आवश्यक आहे. या विषयाकडे गांभिर्याने पाहून मुदतवाढ द्यावी, अशी मागणीही खा.बजरंग सोनवणे यांनी केली आहे. यावेळी केंद्रीय अल्पसंख्यक मामले विभागाचे मंत्री किरेन रिजिजू यांनी खा.बजरंग सोनवणे यांना या विषयावर वैयक्तिक लक्ष घालून आवश्यक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. खा.बजरंग सोनवणे सातत्याने सामाजिक विषय मांडत असल्याने त्यांच्या पाठपुराव्याचे आणि विषय मांडणीचे कौतूक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *