महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पाऊस आक्रमक झालेला आहे त्यामध्ये. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि घाटमाथा या परिसरात मुसळधार पावसाची सुरुवात झाली असून रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथा भागासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे त्याचबरोबर मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांतही पावसाचा तडाखा बसत असून विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे
हवामान खात्याच्या माहितीनुसार, मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा सध्या दक्षिणेकडे सरकला असल्यामुळे. हा पट्टा दीव, सुरत, नंदुरबार, अमरावतीमार्गे बंगालच्या उपसागरापर्यंत पसरला असून त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रावर होत आहे. अरबी समुद्रात गुजरात किनाऱ्यालगत चक्राकार वारे देखील सक्रिय झाले आहेत. यामुळे पुढील 48 तासांत अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे
गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील 12 ते 14 लाख एकरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला असून सोयाबीन, मका, भात आणि ऊस यांची पिके पाण्याखाली गेली आहेत. राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे व भरपाई प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत
अशा हवामानात शेतकऱ्यांनी खालील उपाययोजना करणे गरजेचे आहे –
पाणी निचरा: शेतात पाणी साचू नये, अन्यथा पिकांची मुळे कुजतात. शक्य तितक्या लवकर निचऱ्याची व्यवस्था करावी.
कीड व रोग नियंत्रण: जास्त ओलाव्यामुळे देखील रोगराई व कीड वाढते. शेतात फेरफटका मारून लक्षणे दिसताच त्वरित उपचार करावेत.
रासायनिक फवारणी योग्य वेळी: पाऊस थांबल्यावरच औषधांची फवारणी करावी. हवामानाचा अंदाज लक्षात घेणे महत्त्वाचे.
चारा साठवणूक: मुसळधार पावसामुळे हिरव्या चाऱ्याची कमतरता भासू शकते. त्यामुळे कोरडा व सुरक्षित चारा साठवावा.
पंचनाम्यासाठी अर्ज: नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी महसूल व कृषी खात्याशी संपर्क साधून पंचनाम्यात नाव नोंदवावे तसेच पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी वेळेत अर्ज करावा.
सध्या कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टीची परिस्थिती कायम आहे. राज्य सरकारने यंत्रणा सतर्क ठेवली असून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.
पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे शेतकर्याचे लाखो एकरवरील खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. रायगड व पुणे घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट जारी आहे. शेतकऱ्यांनी तातडीने पाणी निचरा, रोग नियंत्रण व पंचनाम्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.