“गॅस, बद्धकोष्ठता वाढवणाऱ्या भाज्या आता लगेच बंद करा!”
“मूळव्याधीचं दुखणं टाळायचंय? मग आहारात या भाज्यांना नाही म्हणाच!”
मूळव्याध ही एक सामान्य पण अतिशय वेदनादायक समस्या आहे. ही स्थिती गुदद्वाराच्या आसपासच्या रक्तवाहिन्यांमध्ये सूज येणे गाठी निर्माण होण्यामुळे होते. काही वेळा ही सूज आतून असते, त्याचबरोबर काही वेळा बाहेरून स्पष्ट दिसते. या अवस्थेमध्ये रुग्णाला शौच करताना प्रचंड वेदना होतात, कधीकधी रक्तस्त्रावही देखील होतो. शौचाच्या वेळी खूप जोर द्यावा लागतो, चुकीचा आहार घेतल्याने , जास्त वेळ एका जागेवर बसून राहणे, गर्भधारणा किंवा जास्त वजन वाढल्यामुळे मूळव्याधीचा धोका संभवतो

मूळव्याधीचा खरा शत्रू म्हणजे – बद्धकोष्ठता!
जेव्हा मल कडक होतो आणि शौचास वेळ लागतो, तेव्हा गुदद्वाराच्या रक्तवाहिन्यांवर दाब येतो. सतत अशा जास्त दबावामुळे नसांमध्ये सूज येते आणि मूळव्याधीची सुरुवात होते. त्यामुळे या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी, सर्वप्रथम पचनसंस्थेला योग्य आणि बरोबर ठेवणं आवश्यक असते
- Weather Alert: या जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता ; 24 जिल्ह्यांना अलर्ट
- Central Government Alert केंद्रा कडून ; सर्व राज्यांना पत्र 20 दिवसांत ॲक्शन प्लॅन तयार करण्याचे आदेश
- ZP Election जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर ; कोणत्या जिल्ह्याला कोणतं आरक्षण?
- Weight Lose सकाळी करा ही ५ कामे; पोटाची चरबी कमी होईल
- Nano Banana AI वापरून काही मिनिटांत 3D फोटो कसा बनवायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
आहाराचं महत्त्व
मूळव्याधीच्या रुग्णांनी आपल्या आहारात भरपूर फायबरयुक्त म्हणजे अन्न, पाणी आणि हलका आहार घेणं गरजेचं आहे. परंतु, काही भाज्या अशा आहेत ज्या वरून आरोग्यासाठी चांगल्या वाटल्या तरी त्या मूळव्याधीच्या व्यक्तींना अधिक नुकसान कारक ठरत असतात . त्या भाज्यांमध्ये असणारे घटक पित्त, वात वाढवतात व पचन बिघडवतात.
मुळव्याधी असणाऱ्यांना या पाच भाज्या टाळाव्यात
वांगी ही एक रोजच्या जेवणामध्ये प्रमुख भाजी असली तरी मूळव्याधी असलेल्या व्यक्तींनी ती टाळणे चांगले ठरते. वांग्याचे सेवन केल्याने पित्त व वात दोष वाढतात. यामुळे पचन बिघडते, गॅस व आम्लता वाढते आणि शौचास अडचण निर्माण होते
वांग्याचे त्वचेला चिळटपणा देणारे घटक मूळव्याधीच्या सूजलेल्या भागावर परिणाम करतात. तसेच, काही लोकांना वांग्यामुळे अॅलर्जीसदृश त्रासही होतो, जो मूळव्याधीच्या वेदना देखील वाढवतो
दुसरा काय खायचं
वांगी खाण्याऐवजी दुसरा पर्याय म्हणून शिजवलेली भोपळ्याची भाजी शरीरासाठी व मुळव्याधी असणाऱ्या साठी अधिक लाभदायक आहे.
कांद्याचा मूळ गुणधर्म हा उष्ण प्रकारचा आहे कच्च्या कांद्यामुळे शरीरातील उष्णता वाढते आणि गुदद्वाराजवळ असलेली सूज, जळजळ यामध्ये वाढ होते. विशेषतः उन्हाळ्याच्या काळात कच्चा कांदा खाण्याने मूळव्याधीच्या वेदना अधिक तीव्र होतात.
कांद्यातील काही एन्झाईम्स व प्रोटीन्स पचनासाठी कठीण असतात. यामुळे गॅस व अपचन होऊ शकतो. कधीकधी यामुळे मल अधिक घट्ट होतो आणि शौचास जोर देण्याची वेळ येते.
ज्या व्यक्तींना कांदा आवडतो त्यांनी कांद्याऐवजी कांद्याची पात खाल्ल्याने चांगली
अरबी म्हणजेच कोलूकंद ही खूपच जड व पचायला कठीण भाजी आहे. यामध्ये स्टार्चचं प्रमाण खूप जास्त असून ते पचनात अडथळा निर्माण करतं. अरबी खाल्ल्यानंतर अनेक लोकांना गॅस, फुगवटा आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होतो.
मूळव्याधी असलेल्या रुग्णांना आतूनच गुदद्वाराजवळ सूज असते, त्यावर अधिक दाब आल्यास रक्तस्त्राव होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या शरीरासाठी अरबी टाळणं केव्हाही सुरक्षित.
उपाय – जर खायचीच असेल तर अरबी थोडी उकडून, सुकी करून व लिंबाचा रस त्यामध्ये टाकून खाणं थोडं पचनास मदत होते
४) कोबी आणि फुलकोबी (Cabbage & Cauliflower)
या दोन्ही भाज्या गॅस निर्माण करणाऱ्या मानल्या जातात. यांमध्ये काही साखर-सदृश घटक असतात (जसे की raffinose), जे मोठ्या आतड्यांमध्ये गॅस उत्पन्न करतात. यामुळे पोट फुगतं, अस्वस्थता वाढते आणि मूळव्याधीचा त्रास दुप्पट होतो.
अर्धवट शिजवलेली कोबी खाल्ल्यास संसर्गाचीही शक्यता असते. मूळव्याधीच्या काळात शरीराचा प्रतिकारशक्तीचा भागही कमजोर झालेला असतो, त्यामुळे संसर्ग अधिक वेगाने होतो.
त्याऐवजी – गाजर, दुधी, दवस भाजी यांचा उपयोग करा.
पालक फायबरयुक्त असला तरी कच्च्या स्वरूपात खाल्ल्यास पचनशक्तीवर दुष्परिणाम होतो. कच्चा पालक गॅस आणि अपचन वाढवतो. यामुळे आतड्यांवर दाब येतो आणि मूळव्याधीच्या व्रणांवर ताण येतो.
पालकामध्ये ऑक्सालिक अॅसिड असते जे पचण्यास कठीण असते. त्यामुळे ही भाजी नेहमी उकडून, ताकासोबत किंवा लिंबू टाकून खाणं चांगलं ठरतं.
सल्ला – पालक शिजवूनच खावा आणि शक्य असल्यास गहूगळ (गेहूगुंठ) किंवा मेथीची भाजी पर्याय म्हणून घ्या.
मूळव्याधी असताना आहारात काय घ्यावे?
मुळव्याधी असणाऱ्या भरपूर पाणी प्यावे (कमीत कमी ८–१० ग्लास) दर दिवस
शिजवलेले फायबरयुक्त अन्न – ओट्स, दलिया, ज्वारी-नाचणीचे पदार्थ आवश्यक खावेत
ताक, लिंबूपाणी, अंजीर, मनुका भिजवून खाणे
शौचास वेळेवर जाणे व जोर देणे टाळा
गरम पाण्याने स्नान आणि Sitz Bath (कोमट पाण्यात बसणे) करून सूज कमी करणे
मुळव्याधीसारख्या आजारांवर वेळीच लक्ष देणे गरजेचे असते
पण दुर्लक्ष केल्यास ही स्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे वेळीच योग्य आहार, जीवनशैलीत बदल आणि डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं ठरतं.
वरील पाच भाज्यांपासून दूर राहा आणि आपल्या पचनसंस्थेला आरामदायक, हलका आहार द्या. कारण आहार बदललात तरच आजार सुधारतो!