मराठवाडा विभागीय अबॅकस स्पर्धेत राजयोग अबॅकसची गरुडझेप

Spread the love

42 विद्यार्थी ट्रॉफी विनर, राष्ट्रीय स्पर्धेसाठी गोवा येथे निवड

Verification: 1fe30fb203b45d5d

छत्रपती संभाजीनगर:
मराठवाडा विभागीय अबॅकस स्पर्धेत राजयोग अबॅकस, एन-4 सिडको येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल 42 ट्रॉफी पटकावल्या असून विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी गोवा येथे निवड झाली आहे.

Amazon

Amazon App Player

Download Now

स्पर्धेत मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतून 700 ते 800 विद्यार्थी सहभागी झाले होते. अवघ्या सहा मिनिटांत 100 गणिते सोडविण्याच्या या स्पर्धेत श्लोक सौरभ गरड याने तीन मिनिटांत पेपर पूर्ण करत 100 पैकी 100 गुण मिळवले व ‘मॅथ मॅजिशियन’ किताब पटकावला.

संस्थेच्या एकूण 60 विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सहभाग नोंदवून केंद्रास ‘उत्कृष्ट केंद्र’ हा मान मिळवून दिला.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे सरस्वती न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल, बर्दापूरचे मुख्याध्यापक श्री. मधुकर जाधव तसेच रुद्रम प्रोॲक्टिव्ह अबॅकस, बर्दापूरच्या संचालिका सौ. संध्याराणी जाधव यांनी विशेष अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी मुख्याध्यापक श्री. मधुकर जाधव म्हणाले,
“राजयोग अबॅकसच्या विद्यार्थ्यांनी मराठवाडा विभागीय स्पर्धेत मिळवलेले यश अत्यंत अभिमानास्पद आहे. या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचा पाठिंबा आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आहे. विद्यार्थ्यांनी हीच जिद्द, एकाग्रता व परिश्रम पुढील राष्ट्रीय स्पर्धेतही कायम ठेवावेत आणि नव्या उंचीवर यश मिळवावे, हीच मनःपूर्वक शुभेच्छा.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now