तळपायाला कांदा ठेवण्याचा आजीबाईंचा उपाय पुन्हा चर्चेत

झोपण्यापूर्वी पायाखाली कांद्याची चकती ठेवणे हा उपाय आजी-आजोबांच्या काळापासून वापरला जातो. जेव्हा महागडी औषधे नव्हती, तेव्हा असेच घरगुती उपाय आरोग्य सुधारण्यासाठी उपयोगी ठरत होते. आता हा उपाय पुन्हा चर्चेत आला आहे आणि त्यामागे काही रोचक कारणे आहेत.
कांदा – फक्त स्वयंपाकात नाही, आरोग्यासाठीही!
कांद्यात असतात सल्फर, अँटी-बॅक्टेरियल आणि डिटॉक्सिफायिंग गुणधर्म. म्हणूनच काही लोक झोपण्यापूर्वी तळपायाला कांदा ठेवून मोजे घालतात. हा उपाय ऐकायला जरी विचित्र वाटला तरी अनेकांचा अनुभव वेगळंच सांगतो.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
आहारतज्ज्ञ श्रेया गोयल यांच्या मते हा उपाय काही बाबतीत फायदेशीर ठरू शकतो.
- काय फायदे सांगितले जातात?
रक्त शुद्धीकरण
रात्री कांदा पायाखाली ठेवल्यास त्यातील फॉस्फोरिक अॅसिड त्वचेतून शोषले जाऊन रक्तातील अशुद्धी बाहेर टाकण्यास मदत करते, असा दावा केला जातो.
डिटॉक्सिफिकेशन
शरीरातील विषारी घटक कमी करण्यात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यात उपयोगी ठरू शकतो.
सर्दी-खोकल्यात आराम
सर्दी, कफ आणि श्वासाच्या त्रासात हा उपाय आराम देतो असे मानले जाते. नैसर्गिक थंड गुणधर्म यामागे कारणीभूत.
त्वचा मऊ आणि ओलसर
रात्री कांदा ठेवल्याने पायांची त्वचा मऊ होते आणि ओलावा टिकतो.
जंतू आणि बुरशी कमी
पायातील दुर्गंध आणि बुरशी कमी होण्यास मदत होऊ शकते.
हा उपाय कसा करायचा?
एक मध्यम आकाराचा लाल किंवा पांढरा कांदा घ्या
स्वच्छ धुऊन जाड चकती कापा
झोपण्यापूर्वी चकती तळपायाच्या मध्यभागी ठेवा
त्यावर मोजे घाला आणि रात्रभर ठेवा
सकाळी पाय धुवून टाका
वैज्ञानिक पुरावे?
यातील काही दावे पारंपरिक अनुभवांवर आधारित आहेत. मात्र पूर्ण वैज्ञानिक पुरावे मर्यादित आहेत. तरी अनेकांना सर्दी-खोकल्यात आराम, पायांचा दुर्गंध कमी आणि चांगली झोप मिळाल्याचा अनुभव आहे.
हा उपाय अगदी साधा आहे आणि किमान हानिकारक नाही. मात्र अॅलर्जी किंवा त्वचेची समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
महागड्या औषधांपेक्षा घरच्या घरी करता येणारा ५ रुपयांचा उपाय शरीराला आराम देतो, अशी अनेकांची खात्री आहे.
एकदा करून पाहण्यात हरकत नाही…
कदाचित “सकाळी काय घडलं?” हे तुम्हालाही सांगावं लागेल!
Hola! RushBetMexico is actually quite good, especially if you’re into all sorts of sports. The site has a ton of options, and the betting is pretty simple. Check them out if you want to get into betting on sports at rushbetmexico.