Tatkal Ticket Booking Update रेल्वेचा नवा नियम! तत्काळ तिकीट बुकिंगसाठी आता ओटीपी अनिवार्य

Spread the love
Chhatrapati Shivaji Terminus, main train station in Mumbai, trains depart
Verification: 1fe30fb203b45d5d

Railway Update नवी दिल्ली : रेल्वेत शेवटच्या क्षणी तिकीट मिळवणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा बदल लागू झाला आहे. रेल्वे मंत्रालयाने तत्काळ तिकिटांसाठी ओटीपी (वन टाइम पासवर्ड) आधारित आरक्षण प्रणाली सुरू केली असून आता खिडकीवरून तिकीट काढताना ओटीपी देणे अनिवार्य आहे. ही पद्धत १७ नोव्हेंबरपासून काही गाड्यांमध्ये सुरू झाली असून सध्या ५२ गाड्यांमध्ये ती लागू आहे. पुढील काही दिवसांत देशातील सर्वच गाड्यांमध्ये अशी प्रक्रिया सुरू होणार आहे.

Amazon

Amazon App Player

Download Now

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तात्काळ आरक्षणात शेवटच्या मिनिटाला होणारे गैरप्रकार, एजंटांकडून होणारे दुरुपयोग आणि तिकिटांची काळाबाजारी रोखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. नव्या पद्धतीमुळे बोगस आरक्षणांना आळा बसेल, तसेच खरी आवश्यकता असलेल्या प्रवाशांना तिकीट मिळण्यास मदत होईल, असा मंत्रालयाचा विश्वास आहे.

  • कशी होणार ओटीपी पडताळणी?Tatkal Ticket OTP

खिडकीवरून तिकीट काढताना प्रवाशाला आरक्षण फॉर्मवर मोबाईल क्रमांक लिहावा लागेल.
त्या क्रमांकावर ओटीपी पाठवला जाईल.
आरक्षण क्लर्कसमोर तो ओटीपी दाखवल्यानंतरच तत्काळ तिकीट दिले जाईल.

रेल्वे मंत्रालयाच्या मते, यामुळे तिकीट बुकिंग प्रणालीमध्ये पारदर्शकता वाढेल, कोणीही इतरांच्या ओळखीचा चुकीचा वापर करू शकणार नाही आणि सर्व नोंदी मोबाईल क्रमांकावरून सहज शोधता येतील.

तत्काळ आरक्षण ही रेल्वेतील सर्वाधिक लोकप्रिय सुविधा मानली जाते. प्रवासाचा निर्णय अचानक घेतल्यास किंवा काही कारणांमुळे आगाऊ आरक्षण शक्य नसल्यास तत्काळ तिकीट प्रवासी मोठ्या प्रमाणावर घेतात. पुणे विभागात या सुविधेला सर्वाधिक मागणी असल्याचे आकडेवारी सांगते.

एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत पुणे रेल्वे विभागातून तब्बल १० लाख ७७ हजार १०० प्रवाशांनी तत्काळ तिकिटे घेतली आहेत. यामध्ये सर्वाधिक वाटा पुणे स्थानकाचा आहे.

  • कोठे सर्वाधिक तिकिटे? आकडे स्पष्ट
  • पुणे विभागातील प्रमुख स्थानकांपैकी पुढील आकडेवारी समोर आली आहे –

पुणे – ६,३८,३४४ तिकिटे

कोल्हापूर – १,७७,२४९ तिकिटे

शिर्डी – ९८,१३० तिकिटे

मिरज, सांगली, सातारा, हडपसर या स्थानकांवरही प्रवाशांची मोठी वर्दळ आहे.

दररोज पुण्यातून २००हून अधिक गाड्यांची ये-जा होते. त्यापैकी ७२ रेल्वे गाड्या पुणे स्थानकावरून सुटतात. यामुळेच तत्काळ काउंटरवर प्रवाशांची नेहमीच गर्दी असते.

  • तत्काळ कोटा कधी उघडतो?

रेल्वे नियमांनुसार तत्काळ बुकिंगचा वेळ निश्चित आहे.

AC तिकीटांसाठी – सकाळी १० वाजता

स्लीपर तिकीटांसाठी – सकाळी ११ वाजता

या वेळेत काही मिनिटांत तिकीटे संपून जातात. त्यामुळे प्रवाशांनी वेळेआधी रांगेत पोहोचणे गरजेचे असते.

रेल्वे प्रशासनाचा दावा आहे की, ओटीपी प्रणालीमुळे प्रवाशांची सुरक्षा आणि सोय वाढेल, तिकीट खरेदीची प्रक्रिया अधिक पारदर्शक बनेल आणि गैरव्यवहारांना आळा बसेल. आगामी काळात ही व्यवस्था देशभरातील सर्व गाड्यांमध्ये लागू होणार असून तत्काळ तिकिटांची उपलब्धता अधिक सुलभ होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now