
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन ४ आणि ५ डिसेंबरला भारत दौर्यावर येत असून, त्यांच्या या भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. उच्चस्तरीय बैठका, धोरणात्मक चर्चा आणि भारत-रशिया संबंधांमध्ये नवा टप्पा अधोरेखित करणाऱ्या या दौऱ्याची सुरुवात पुतिन यांच्या शाही निवासानेच होते. पुतिन यांच्यासाठी दिल्लीतल्या सुप्रसिद्ध आयटीसी मौर्या हॉटेलमधील आलिशान ‘प्रेसीडेंशियल सुट’, ज्याला ‘चाणक्य सुट’ म्हणूनही ओळखले जाते, विशेष आरक्षित करण्यात आला आहे.

- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
ओबामा, बायडेननंतर आता पुतिन – ‘चाणक्य सुट’ची आंतरराष्ट्रीय ओळख
या सुटने याआधीही अनेक जागतिक नेत्यांचे स्वागत केले आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि जो बायडेन यांसारख्या ग्लोबल आयकॉननीदेखील याच सुटमध्ये मुक्काम केला होता. रशियन सुरक्षा पथक भारतात दाखल झाले असून, त्यांनी हॉटेलची सखोल पाहणी पूर्ण केली आहे.
ITC मौर्या – ४० वर्षांची परंपरा आणि प्रतिष्ठा
आयटीसी मौर्या हे हॉटेल जवळपास चार दशकांपासून भारत भेट देणाऱ्या राष्ट्राध्यक्षांचे पसंतीचे ठिकाण मानले जाते. ४११ खोल्या आणि २६ आलिशान सुट्स, बुखारा आणि दम पुख्तसारखी जगप्रसिद्ध रेस्टॉरंट्स, भव्य बँक्वेट्स, अत्याधुनिक वेलनेस सुविधा—हे सर्व या हॉटेलला खास बनवते.
‘चाणक्य सुट’ – ४,६०० चौरस फुटांवरील शाही साम्राज्य
चाणक्य यांच्या रणनीती आणि दूरदृष्टीचे प्रतीक म्हणून या सुटला हे नाव देण्यात आले आहे. ४,६०० चौरस फुटांचा हा भव्य सुट आपल्या अप्रतिम सजावटीसाठी आणि राजेशाही वातावरणासाठी ओळखला जातो.
- सुटमधील प्रमुख सुविधा:
- मास्टर बेडरूम
- खासगी स्टीम आणि सौना रूम
- पर्सनल जिम
- १२ आसनांची डाइनिंग रूम
- वॉक-इन वॉर्डरोब
- स्टडी आणि ऑफिस स्पेस
पाहुण्यांसाठी स्वतंत्र गेस्ट रूम
सुटमधील भिंतींवर अजीज आणि तैयब मेहता यांच्या दुर्मिळ कलाकृतीही शोभा वाढवतात.
एका रात्रीचा खर्च – तब्बल ८ ते १० लाख रुपये!
या शाही अनुभवासाठी पाहुण्यांना एका रात्रीसाठी अंदाजे ८ ते १० लाख रुपये मोजावे लागतात. विशेष बाब म्हणजे—येथे थांबणाऱ्या पाहुण्यांना जगातील कोणत्याही देशातील कुठलीही डिश त्यांच्या इच्छेनुसार बनवून ऑर्डर करता येते.
पुतिनच्या दौऱ्याला जागतिक उत्सुकता
भारत-रशिया सहकार्यातील अनेक महत्त्वाचे करार या दौऱ्यात होऊ शकतात, अशा चर्चांमुळे पुतिन यांचा हा मुक्काम आणखी महत्त्वाचा ठरत आहे. सुरक्षा, ऊर्जा, संरक्षण आणि भू-राजकीय समीकरणांच्या दृष्टीने हा दौरा निर्णायक मानला जात असून, त्यांच्या या ‘शाही’ मुक्कामावरही जगाची नजर खिळली आहे.