चिंचगव्हाण रोडवर भीषण अपघात : १६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यूघटनास्थळी तणावपूर्ण वातावरण

Spread the love

पोलिसांनी प्रसंगावधान राखत टाळला मोठा अनर्थ

Verification: 1fe30fb203b45d5d

माजलगाव-चिंचगव्हाण रोडवर सायंकाळी झालेल्या अतिशय भीषण अपघातात १६ वर्षीय अहात खान आजहर खान पठाण या तरुणाचा ट्रॅक्टरच्या टायरखाली येऊन जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली असून मोठी गर्दी जमा झाल्याने घटनास्थळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

Amazon

Amazon App Player

Download Now

इंदिरानगरातील अहात खान हा आपल्या मोटरसायकलवरून (MH 23 AG 3328) घरी जात असताना चिंचगव्हाणजवळ उसाने भरलेला दोन ट्रॉल्यांचा ट्रॅक्टर समोर आला. मोटारसायकल अचानक पुढे आल्याने ट्रॅक्टरचालकाने प्रसंगावधान राखत वाहन रस्ता सोडून डिव्हायडरकडे वळवण्याचा प्रयत्न केला; मात्र तरीही ट्रॉलीच्या पाठीमागील चाकाखाली अहात खान हा सापडला. चाक डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचा स्वरूप इतका भीषण होता की पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला.

अपघाताची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. संतप्त जमावाने अपघातग्रस्त ट्रॅक्टरची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत केले. पोलिस निरीक्षक राहुल सुर्यतळ यांनी स्वतः उपस्थित राहून परिस्थिती हाताळली. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने ट्रॅक्टर पेटविण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला.

दुर्दैवी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला असून इंदिरानगर परिसरात या घटनेने शोककळा पसरली आहे. अहात खान हा, शांत स्वभावाचा व सर्वांना आदराने वागणारा मुलगा म्हणून परिसरात ओळखला जात होता. अल्पवयात झालेल्या या दुर्दैवी मृत्यूने कुटुंबीयांसह इंदिरानगरातील सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now