
राज्यातील 226 नगरपालिका आणि 38 नगरपंचायतींच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुका पार पडताच आता महापालिका निवडणुकांची सरगर्मी वाढली आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज (४ डिसेंबर) मुंबईसह राज्यातील एकूण 29 महापालिका आयुक्तांची बैठक बोलावली आहे. यामुळे महापालिका निवडणुकीच्या कार्यक्रमाबाबत कोणतीही घोषणा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
मतदार याद्यांवरील आढावा, सज्जतेचे परीक्षण
या बैठकीत प्रारूप मतदार याद्या, त्यांच्या दुरुस्त्या आणि महापालिका स्तरावर सुरू असलेल्या निवडणूक तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. प्रारूप मतदार याद्यांवर हरकती आणि सूचना नोंदवण्याची अंतिम तारीख 3 डिसेंबर संपली असून, या हरकतींवरील निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 10 डिसेंबर रोजी जाहीर होतील. तर मतदान केंद्रनिहाय मतदार यादी 22 डिसेंबर 2025 ला प्रसिद्ध केली जाईल.
महापालिकांकडून मतदार यादीतील दुरुस्तीसाठी वेळवाढ मागितल्यास आयोग आणखी दोन ते तीन दिवसांचा अवधी देण्याच्या मूडमध्ये आहे. आजच्या बैठकीत आयुक्तांकडून मिळालेल्या माहितीवरच निवडणुकीच्या तारखा आणि कार्यक्रम निश्चित होणार असल्याची खात्री आयोगाच्या सूत्रांनी दिली.
नागपूर–चंद्रपूरमध्ये आरक्षणात मोठा बदल
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार नागपूर आणि चंद्रपूर महापालिकांमधील राजकीय आरक्षण मर्यादा 50 टक्क्यांपर्यंत आणण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार महिला खुला प्रवर्ग, ओबीसी आणि ओबीसी महिला या गटांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदांवर अनिश्चिततेचे सावट
नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका संपताच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका घेण्याची तयारी आयोगाने सुरू केली होती. मात्र, 32 पैकी तब्बल 17 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षण 50 टक्क्यांच्या मर्यादेपेक्षा अधिक झाल्याने आता या निवडणुकीबाबत आयोग कोणता मार्ग अवलंबतो याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
आजच्या महत्त्वाच्या बैठकीनंतर महापालिका निवडणुकांचे काऊंटडाऊन औपचारिकपणे सुरू होण्याची शक्यता असून, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात नव्या घडामोडींना सुरुवात होणार आहे.