राज्यात आज मतसंग्राम! 226 नगर परिषदा, 38 नगर पंचायतींसाठी यंत्रणा सज्ज — मतदारांचा कौल कुणाला?

Spread the love
Freepik
Verification: 1fe30fb203b45d5d

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे भविष्य ठरणाऱ्या निवडणुकांसाठी आज मतदारांचा कौल नोंदवला जाणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर रोजी केली होती. त्यानुसार २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतींत निवडणुकांची तयारी सुरू झाली होती. मात्र, न्यायालयीन वादाच्या पार्श्वभूमीवर २० नगर परिषदा आणि चार नगर पंचायतींच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. तसेच ७६ स्थानिक संस्थांतील तब्बल १५४ सदस्यपदेही तात्पुरती थांबवण्यात आली आहेत.

Amazon

Amazon App Player

Download Now

उर्वरित नगर परिषदा आणि नगर पंचायतींमध्ये काल रात्री प्रचाराचा शेवटचा घंटानाद झाला. या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिलेला मुद्दा म्हणजे दुबार मतदारांचा. निवडणूक आयोगाने संशयित दुबार मतदारांच्या नावांसमोर दोन स्टार लावून मतदारयादी जाहीर केल्या आहेत. अशा मतदारांना मतदान केंद्रावर येताना ‘इतरत्र मतदान करणार नाही’ असे शपथपत्र भरावे लागणार आहे. यावर नेमका प्रतिसाद काय मिळेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मतदारांसाठी सुट्टी

मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी संबंधित नगर परिषद व नगर पंचायतींच्या मतदारसंघांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मतदारसंघाच्या बाहेर कामानिमित्त असलेल्या मतदारांनाही ही सुट्टी लागू राहणार आहे. केंद्र सरकारची कार्यालये, बँका आणि इतर संस्थांना ही सुट्टी बंधनकारक असेल.

  • मतदानासाठी तयारी — यंत्रणा पूर्ण सज्ज

✔ २६४ अध्यक्षपदे आणि ६,०४२ सदस्यपदांसाठी मतदान
✔ १२,३१६ मतदान केंद्रांवर ६२,१०८ निवडणूक अधिकारी व कर्मचारी तैनात
✔ पोलिसांचा बंदोबस्त आणि सुरक्षा व्यवस्थेचा मजबूत तट
✔ ईव्हीएमची मुबलक उपलब्धता — १७,३६७ कंट्रोल युनिट आणि ३४,७३४ बॅलेट युनिट्स

राज्यभरात सुरू असलेल्या या महत्त्वाच्या निवडणूक प्रक्रियेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचे पुढील पाच वर्षांचे नेतृत्व आज ठरणार आहे. कोणाच्या बाजूने जनमत झुकते, स्थानिक पातळीवरील कोणती राजकीय समीकरणे बदलतात आणि नेमका कौल कोणाला मिळतो — हे सगळे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

राज्याचं राजकारण, स्थानिक पातळीवरील विकास आणि जनतेचा विश्वास… आजचा मतसंग्राम या सर्वच मुद्द्यांची कसोटी पाहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now