सरस्वती न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल, बर्दापूर येथे जागतिक एड्स दिन साजरा

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

बर्दापूर /
दि. ०१ डिसेंबर २०२५ : येथील सरस्वती न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल, बर्दापूर येथे सोमवार (दि. ०१ डिसेंबर २०२५) रोजी जागतिक एड्स दिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात व जनजागृतीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात एचआयव्ही/एड्सविषयी जनजागृतीपर प्रार्थना व संकल्प वाचनाने करण्यात आली.

Amazon

Amazon App Player

Download Now

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक मधुकर जाधव हे होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी सांगितले की, “एचआयव्ही/एड्स हा केवळ आजार नसून तो सामाजिक प्रश्न आहे. योग्य माहिती, सुरक्षित सवयी आणि सकारात्मक दृष्टिकोनातूनच त्याविरुद्ध प्रभावी लढा देता येतो. विद्यार्थ्यांनी अफवांपेक्षा वैज्ञानिक माहिती स्वीकारावी व समाजात जनजागृती करावी,” असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे शाळेच्या मैदानावर सर्व विद्यार्थ्यांना उभे करून ‘लाल रिबन’चा भव्य आकार साकारण्यात आला. या उपक्रमातून एकजूट, सहानुभूती व आरोग्यविषयक जागृतीचा प्रभावी संदेश देण्यात आला.

विद्यार्थ्यांना एचआयव्ही/एड्सची कारणे, संसर्गाचे मार्ग, प्रतिबंधात्मक उपाय व उपलब्ध उपचार पद्धती यांची माहिती देण्यात आली. लाल रिबन हे एड्स जनजागृतीचे प्रतीक असून समाजात रुग्णांप्रती सहानुभूती निर्माण करणे आवश्यक असल्याचे अधोरेखित करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी निकिता शिंपले, संगीता धुमाळ, जना माने, पंकजा पवार, समिना अत्तार, अर्पिता कुलकर्णी, सुनिता सोनवणे, सीमा कोरडे तसेच इतर शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी एड्सविषयी जनजागृतीपर घोषवाक्ये देत समाजात सुरक्षिततेचा व सकारात्मकतेचा संदेश पोहोचवण्याचा निर्धार केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now