
मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकाल प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला असून, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निवडणूक निकाल २१ डिसेंबरला घोषित करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे संपूर्ण निवडणूक व्यवस्थापनाच्या वेळापत्रकात मोठा फेरबदल करण्यात आला आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे २० डिसेंबरपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे. तसेच निकालापूर्वी कोणत्याही प्रकारचे एक्झिट पोल प्रसारित करण्यास सक्त मनाई असणार आहे. आज राज्यभर मतदान शांततेत पार पडत असताना, मूळ वेळापत्रकानुसार उद्या निकाल जाहीर होणार होते. मात्र न्यायालयीन सुनावणीनंतर आयोगाने निकालांची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
राज्यातील सुमारे २० जिल्ह्यांतील काही प्रभागांमध्ये निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या—यामध्ये पुणे, सोलापूर, चंद्रपूर, यवतमाळ, अहिल्यानगर, धाराशिव, नांदेड आणि ठाणे जिल्ह्यांचा समावेश आहे. अनेक कार्यकर्त्यांनी हा विलंब अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त केले असले तरी, पारदर्शकतेसाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
दरम्यान, सर्व ईव्हीएम मशिन्स २१ डिसेंबरपर्यंत सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाला सुरक्षा, मनुष्यबळ आणि तांत्रिक समन्वयाची मोठी कसरत करावी लागणार आहे. कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह मतदारांवर पडू नये, तसेच निवडणूक प्रक्रिया संपूर्णत: पारदर्शक राहावी, यावर न्यायालयाने विशेष भर दिला आहे.
आता राज्यातील सर्व राजकीय पक्षांची नजर २१ डिसेंबरकडे लागली आहे. या निकालांमुळे अनेक नगरपरिषदांमधील सत्तासमीकरणात मोठे बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.