कॉर्नर बैठकीचे जाहीर सभेत रूपांतर

माजलगाव /
नगरपालिकेच्या निवडणुकीत अंतिम टप्प्याला वेग आला असून प्रभाग क्रमांक १३ मधील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या उमेदवारांच्या प्रचाराला जबरदस्त उत्साह लाभत आहे. आझाद नगर परिसरातील साधी कॉर्नर बैठक काल अचानक भव्य जाहीर सभेत परिवर्तित झाली आणि या दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार सय्यद अफसानाबी सलीम बापू आणि उषा अशोक लांडगे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेली ही कॉर्नर बैठक सामान्यतः छोट्या स्वरूपाची असावी अशी अपेक्षा होती. मात्र स्थानिक नागरिकांचा ओघ इतका प्रचंड होता की काही वेळातच ही बैठक जाहीर सभेच्या स्वरूपात बदलली. उपस्थित नागरिकांनी उमेदवारांना जबरदस्त पाठींबा दर्शवत प्रभाग १३ मध्ये दोन्ही महिला उमेदवारांचा विजय ‘आजच निश्चित’ असल्याचे वातावरण तयार केले.

सभेला सहाल चाऊस, बाबुराव पोटभरे, नारायणराव डक, श्रीहरी मोरे आणि सय्यद सलीम बापू यांची प्रमुख उपस्थिती राहिली.
या वेळी सहाल चाऊस म्हणाले, “या भागातील सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी आमचे खास लक्ष आहे. नगराध्यक्ष पदासाठी आमचे शिफा बिलाल चाऊस आणि नगरसेवक पदासाठी सय्यद अफसानाबी व उषा लांडगे यांना मतदारांनी आशीर्वाद द्यावा,” अशी विनंती त्यांनी केली.
तसेच बाबुराव पोटभरे म्हणाले, “या भागासाठी आमचे घर सदैव उघडे आहे. लवकरच गौतम नगरमध्ये स्वखर्चाने भव्य पुतळा उभारण्याचा शब्द मी देतो, मात्र त्यासाठी आपले प्रचंड मतांचे समर्थन आवश्यक आहे,” असे आवाहन त्यांनी केले.
सभेला मिळालेल्या अपूर्व प्रतिसादामुळे विरोधकांच्या खांद्यावर चिंता स्पष्ट दिसत आहे. मतदारांचा कल पाहता दोन्ही उमेदवारांना मोठ्या मतांनी विजय मिळेल, अशी चर्चा सर्वत्र आहे. यामुळे घाबरलेले विरोधक आता खालच्या पातळीवर जाऊन टीका करत असल्याचेही समोर येत आहे.
२ डिसेंबर रोजी मतदान होणार असून अध्यक्ष व २६ नगरसेवक या निवडणुकीत निवडले जाणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग १३ मध्ये निर्माण झालेली ही प्रचंड उत्साहाची लाट येत्या निकालाची दिशा बऱ्याच अंशी स्पष्ट करताना दिसत आहे.