प्रभाग क्रमांक १० मध्ये अभय भैय्या होके यांच्या विजयाची लाट

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

माजलगाव : दर्शन डोंगरे
माजलगाव नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्र. १०-ब मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार अभय राजाभाऊ होके पाटील यांच्या प्रचाराला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रभागात अभय भैय्या होके पाटील यांच्या विजयाची लाट स्पष्टपणे जाणवत आहे. घरदारी भेटीगाठीदरम्यान नागरिकांनी त्यांच्या विजयाचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे.

Amazon

Amazon App Player

Download Now


उमेदवार अभय भैय्या होके पाटील यांनी सर्वसमावेशक, लोकाभिमुख आणि पारदर्शक कारभाराची ग्वाही देत प्रभागातील मूलभूत सुविधा, पायाभूत विकास, नागरिकांच्या समस्या निराकरण तसेच नव्या विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी यावर भर देणार असल्याचे सांगितले.
महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, व्यावसायिक अशा सर्वच घटकांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहता “विकासासाठी अभय भैय्या होके पाटील यांना साथ” असा स्पष्ट कल मतदारांनी दर्शविला आहे. या वाढत्या जनसमर्थनामुळे प्रभागात त्यांच्याबाबत अनुकूल वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्त्यांमध्येही प्रचंड उत्साह दिसून येत आहे.


“सहकाऱ्यांची जिद्द, थोरामोठ्यांचे आशीर्वाद आणि नागरिकांचे प्रेम माझ्या पाठीशी आहे. प्रभाग क्र. १०-ब ला सकारात्मक व विकासाभिमुख नेतृत्व देण्यासाठी मी कटिबद्ध आहे,” असे अभय भैय्या होके पाटील यांनी दैनिक आपला बळीराजा शी बोलताना सांगितले.
प्रभागातील प्रत्येक मतदाराशी थेट संवाद साधताना मिळणारा प्रतिसाद पाहता येणाऱ्या निवडणुकीत अभय भैय्या होके पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने विजय निश्चित असल्याचा दृढ विश्वास कार्यकर्ते व समर्थकांनी व्यक्त केला आहे. “प्रभागाला सक्षम, विकासाभिमुख आणि लोकाभिमुख नेतृत्व देण्याची वेळ आली आहे,” असा निर्धार अनेक नागरिकांनी व्यक्त केला

One thought on “प्रभाग क्रमांक १० मध्ये अभय भैय्या होके यांच्या विजयाची लाट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now