सामाजिक कार्याच्या बळावर दोन्ही उमेदवारांना मिळतोय दमदार पाठिंबा

माजलगाव :
आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १२ मध्ये चुरशीची लढत रंगू लागली आहे. महिला राखीव जागेसाठी उषाताई महादेव बनसोडे आणि सय्यद रफिक अली या दोन्ही उमेदवारांच्या डोर टू डोर मोहिमेला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या प्रभागातील राजकीय समीकरणांना आता वेगळीच चालना मिळत आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
स्थानिक पातळीवरील सक्रियता, नागरिकांशी सातत्याने राखलेला संवाद आणि गेल्या काही वर्षांत सामाजिक क्षेत्रात केलेले काम या आधारावर दोन्ही उमेदवारांची ताकद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. विशेषत: कोरोना काळात कोणतीही प्रसिद्धी न करता मदतीचा हात पुढे करणाऱ्या उषाताई बनसोडे यांच्या सामाजिक कार्याची दखल आजही नागरिक घेत आहेत. अनेकांना अत्यावश्यक परिस्थितीत वेळेवर दिलेल्या मदतीमुळे त्यांच्याविषयी ‘हक्काचा आधार’ अशी प्रतिमा निर्माण झाली असून, या वेळेसही त्यांना प्रभागातील नागरिकांकडून उल्लेखनीय पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे, सय्यद रफिक अली यांचाही या प्रभागात ठोस जनाधार असून सातत्याने केलेल्या जनसंपर्कामुळे त्यांचा प्रभाव लक्षणीय आहे. स्थानिकांशी जुळलेली नाळ, विविध सामाजिक उपक्रमांमधील सहभाग आणि लोकांपर्यंत पोहोचण्याची त्यांची शैली यामुळे प्रभागात त्यांच्याही बाजूने अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या दोन्ही उमेदवारांनी डोर टू डोर भेटींचा वेग वाढवला असून नागरिकही मोठ्या उत्सुकतेने त्यांचे म्हणणे ऐकत आहेत. काल झालेल्या मोहिमेदरम्यान मिळालेला प्रतिसाद पाहता प्रभाग १२ मध्ये ही लढत अधिकच रंगतदार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. नागरिकांचा वाढता विश्वास, उमेदवारांची दृढ संघटनशक्ती आणि प्रभावी जनसंपर्क पाहता उषाताई महादेव बनसोडे आणि सय्यद रफिक अली या दोन्ही उमेदवारांचा विजय जवळपास निश्चित असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.