बीड जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुका : मतदान व मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

बीड : राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार बीड जिल्ह्यातील बीड, गेवराई, माजलगाव, धारुर, परळी आणि अंबाजोगाई या नगरपरिषदांमध्ये येत्या २ डिसेंबर रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदान पार पडणार आहे. तर मतमोजणी ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरु होईल.

Amazon

Amazon App Player

Download Now

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मा. विवेक जॉन्सन यांनी पोलीस अधीक्षक मा. नवनीत कांवत तसेच जिल्हा स्तरावरील विविध पथक प्रमुख, नोडल अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक अधिकारी आणि पोलीस दलासह बैठक घेऊन संपूर्ण तयारीचा आढावा घेतला. मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेसाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे समाधान जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

मतदानाच्या दिवशी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असून मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ अंतर्गत कलम १६३(२) नुसार मनाई आदेश लागू राहील. मतदान सुरू असताना मतदारांशिवाय इतर कोणालाही मतदान केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, वायरलेस सेट आदी उपकरणांचा वापर या परिसरात कडक बंदी राहील. निवडणुकीशी संबंधित अधिकृत कर्मचारी याला अपवाद असतील.

तसेच मतदान केंद्रातील मतदार प्रतिनिधी, उमेदवारांचे प्रतिनिधी किंवा कोणत्याही व्यक्तीस मोबाईल वापरणे, फोटो काढणे किंवा चित्रीकरण करण्यास मनाई असेल. मतदाराच्या गोपनीयतेला बाधा येईल असे कोणतेही कृत्य कडक प्रतिबंधित राहणार आहे.

मतदान केंद्रापासून १०० मीटर अंतराच्या बाहेर उमेदवार किंवा राजकीय पक्षांनी उभारलेल्या तात्पुरत्या बुथवर कोणतेही भिंतीपत्रक, ध्वज, प्रचार साहित्य लावण्यासही बंदी असेल.

निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन कटाक्षाने दक्ष असून शांततामय आणि सुरळीत मतदानाची तयारी पूर्ण झाल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

One thought on “बीड जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुका : मतदान व मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now