महाराष्ट्र कॅडरचे वरिष्ठ आयएएस अधिकारी

मुंबई /
राज्य प्रशासनात महत्त्वाचा बदल घडत असून सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य सचिव राजेश कुमार हे 30 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी अग्रवाल हे त्याच दिवशी पदभार स्वीकारणार आहेत.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
महाराष्ट्र कॅडरचे वरिष्ठ आयएएस अधिकारी
1989 बॅचचे आयएएस अधिकारी असलेले राजेश अग्रवाल हे महाराष्ट्र कॅडरचे अत्यंत अनुभवी आणि बहुआयामी कारकिर्द असलेले अधिकारी मानले जातात. पंजाबमधील जालंधर हे त्यांचे मूळ गाव असून त्यांनी कॉम्प्युटर सिस्टिममध्ये बी.टेक केले आहे. तांत्रिक ज्ञान आणि प्रशासकीय कौशल्य यांचा प्रभावी संगम त्यांच्या कामकाजात दिसून आल्याने ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत.
तीन दशकांची बहुआयामी प्रशासकीय कारकीर्द
सेवाकाळात अग्रवाल यांनी राज्य प्रशासनात तसेच केंद्र सरकारमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम करून विविध क्षेत्रांचा सखोल अनुभव घेतला आहे.
रत्नागिरी येथील सहायक जिल्हाधिकारी म्हणून कारकीर्द सुरू केल्यानंतर त्यांनी जळगाव जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी, अकोल्याचे जिल्हाधिकारी, मंत्रालयातील विविध विभागांमध्ये सचिव, तसेच केंद्रातील अनेक मंत्रालयांमध्ये संयुक्त सचिव, अतिरिक्त सचिव आणि सचिव या पदांवर कर्तव्य बजावले आहे.
त्यांची कौशल्य विकास विभागातील महासंचालक (प्रशिक्षण) ही भूमिका विशेष उल्लेखनीय मानली जाते. तसेच पेट्रोलियम व नैसर्गिक वायू विभागात अतिरिक्त सचिव आणि वित्त सल्लागार म्हणूनही त्यांनी प्रभावी कामकाज केले.
राजेश अग्रवाल हे तंत्रज्ञानाचा वापर, पारदर्शकता आणि परिणामकारक प्रशासन या बाबींवर विशेष भर देणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे नव्या मुख्य सचिवपदावर ते राज्य शासनाच्या निर्णय प्रक्रिया आणि कार्यपद्धतीत नवे बदल घडवून आणतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
महाराष्ट्राच्या शीर्ष प्रशासकीय पदावर येताच त्यांच्या पुढे विकासात्मक प्रकल्पांची गती, ई-गव्हर्नन्स, आर्थिक शिस्त आणि विविध विभागांतील समन्वय या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असतील.
राज्याचे नवे प्रशासकीय कप्तान म्हणून राजेश अग्रवाल यांच्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.