
राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. येत्या ५ डिसेंबरला राज्यातील सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाने राज्यव्यापी संपाचा इशारा दिल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
काय आहे प्रकरण?
पुण्यात झालेल्या बैठकीत मुख्याध्यापक महामंडळाने ५ डिसेंबर रोजी सर्व शाळा बंद ठेवत जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
शिक्षकांच्या मुख्य मागण्या कोणत्या?
२०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्यता रद्द करावी
१५ मार्च २०२४ चा संचमान्यता शासन निर्णय रद्द करावा
शिक्षणसेवक योजना रद्द करून सर्व शिक्षकांना नियमित वेतनश्रेणी लागू करावी
या मागण्यांसाठी अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू होता. मात्र तो मार्गी न लागल्याने अखेर राज्यव्यापी संपाचा इशारा देण्यात आला आहे.
टीईटीची अट शिक्षकांवर का भार?
मुख्य मागण्यांमध्ये टीईटी परीक्षा अनिवार्यतेचा मुद्दा सर्वात ठळक आहे.
राज्यात आता सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा देणे बंधनकारक केले आहे. परीक्षा दिली नाही किंवा नापास झाल्यास त्या शिक्षकांना पुढे काम करता येणार नाही—हा निर्णय कायम ठेवल्यास हजारो शिक्षक अडचणीत येतील, असा इशारा संघटनेने दिला आहे.
विद्यार्थ्यांवर परिणाम काय?
५ डिसेंबरला शिक्षक संपावर गेल्यास राज्यातील बहुतांश प्राथमिक व माध्यमिक शाळा बंद राहण्याची शक्यता आहे. पालक आणि विद्यार्थ्यांनी अधिकृत घोषणेची प्रतीक्षा ठेवावी, अशी सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात येत आहे.
राज्य सरकार या मुद्द्यावर काय भूमिका घेते, आणि संप टळतो का—याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.