कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे पडतं टक्कल? तज्ञांचा इशारा: ही पोषक कमतरता तात्काळ भरून काढा, अन्यथा परिणाम गंभीर

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

केसगळती आणि टक्कल पडणे ही समस्या आजच्या तरुण पिढीत झपाट्याने वाढताना दिसते. बदलती जीवनशैली, तणाव, प्रदूषण आणि असंतुलित आहार यामुळे केसांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकजण स्पा, केराटिन, स्मूथनिंगसारख्या बाह्य उपचारांवर भर देतात; मात्र शरीरातील पोषक तत्त्वांची कमतरता हीच समस्या मुळापासून निर्माण करत असल्याचे तज्ञांचे मत आहे.

Amazon

Amazon App Player

Download Now

यातील सर्वांत महत्त्वाची कमतरता म्हणजे बायोटिन (Vitamin B7). केस, नखे आणि त्वचेची मजबुती वाढवणाऱ्या ‘केराटिन’ प्रथिनाच्या निर्मितीत बायोटिनची निर्णायक भूमिका असते. प्रतिष्ठित miiskin.com वरील अहवालानुसार, बायोटिनची कमतरता झाल्यास केसांची मुळे कमकुवत होतात आणि केसगळती वेगाने वाढते.

बायोटिनची कमतरता झाल्यावर काय होते?

अतिरिक्त केसगळती सुरू होते

केस पातळ आणि कमकुवत होतात

सहज तुटणारे केस ही सामान्य लक्षणे

दीर्घकाळ कमतरता राहिल्यास टक्कल पडण्याचा धोका वाढतो, विशेषतः पुरुषांमध्ये

कमतरता कशी भरून काढाल? तज्ञांचे मार्गदर्शन

आहारात काही महत्त्वाच्या पदार्थांचा समावेश केल्यास बायोटिनची पातळी नैसर्गिकरीत्या सुधारू शकते

अंडी – विशेषतः अंड्याचा पिवळा बलक

सुकामेवा – बदाम, अक्रोड

दूध व दुग्धजन्य पदार्थ – दूध, दही, पनीर

केळी – सहज उपलब्ध आणि पौष्टिक

मांस व मासे – चिकन, विशेषतः सॅल्मन मासे

तज्ञांच्या मते, फक्त महागडे तेल, शॅम्पू किंवा ट्रिटमेंट्स पुरेसे नसतात. केसांच्या मूळ समस्येवर उपाय हवा असेल, तर आहारातील पोषण सुधारणे अत्यावश्यक आहे. परिस्थितीनुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने बायोटिन सप्लिमेंट्स घेणेदेखील फायदेशीर ठरू शकते.

नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारित असून वैद्यकीय उपचारांसाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

2 thoughts on “कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे पडतं टक्कल? तज्ञांचा इशारा: ही पोषक कमतरता तात्काळ भरून काढा, अन्यथा परिणाम गंभीर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now