अश्‍वचाल स्पर्धेत बिहारच्या ‘एकता एक्सप्रेस’ घोड्याने मारली बाजी :मध्यप्रदेशच्या ‘उडान’ला द्वितीय तर हरियाणाचा ‘बादल’ ठरला तृतीय

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

परभणी /
येथील सय्यद बिल्डर्स अ‍ॅन्ड डेव्हलपर्सच्या वतीने सय्यद अबुबकर भाईजान व सय्यद कादर यांच्या वतीने रविवार 23 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या अश्‍वचाल रेवाल स्पर्धेत बिहारच्या सय्यद फरहान अहेमद यांच्या ‘एकता एक्सप्रेस’ नावाच्या घोड्यावरील मेघुभाई या स्वाराने आपल्या कौशल्याने बाजी मारत प्रथम क्रमांक मिळविला. मध्यप्रदेशच्या लोकेश पवार यांच्या ‘उडान’ नावाच्या घोड्यावरील उस्मान स्वाराने द्वितीय क्रमांक पटकावला. तृतीय क्रमांकाचा मान हरियाणा येथील बाबा राजूदास यांच्या ‘बादल’ घोड्यावर स्वार मोहीतने मिळविला. परभणीच्या कामरान खान यांच्या ‘बाजीगर’ या घोड्यावर स्वार अदनान खान यांनी चौथा तर उत्तरप्रदेशचे श्रीमान अब्दुल्ला खान यांच्या ‘अल अफजल’ घोड्यावरील स्वार अजून खान यांनी पाचवा क्रमांक प्राप्त केला.

Amazon

Amazon App Player

Download Now


येथील ए.आर.स्टड फार्मच्या वतीने सलग चौथ्या वर्षी आंतरराष्ट्रीय अश्‍वचाल रेवालचाल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रासह सहा राज्यातील घोडेस्वारांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवत आपल्या अश्‍वांच्या चालीचे अतीशय मनमोहक असे प्रदर्शन घडवून दिले. स्पर्धेस प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभला. पालकमंत्री सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर, आमदार डॉ. राहुल पाटील, माजी आमदार सुरेश देशमुख, भाजपचे ज्येष्ठ नेते विजय वरपुडकर, बाळासाहेब वरपुडकर, शिवसेनेचे महानगरप्रमुख डॉ. विवेक नावंदर, अ‍ॅड. दीपक देशमुख आदींच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धा संयोजक अबुबकर भाईजान, सय्यद कादर, शोएब भाई, रज्जाक भाई यांच्या पुढाकाराने स्पर्धेचे अतिशय सुनियोजन करण्यात आले होते. देशभरातून आलेल्या अश्‍व, त्यांचे मालक व चालकांची संपूर्ण व्यवस्था संयोजक सय्यद बिल्डर्सच्या वतीने करण्यात आली होती.
यावेळी बोलतांना पालकमंत्री बोर्डीकर व आमदार डॉ. पाटील यांनी स्पर्धेचे कौतूक करतांना आगामी काळात ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर परभणीत होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, त्यासाठी लागणारे सहकार्य आपण करु, अशी ग्वाही दिली. स्पर्धेचे समालोचन निवेदक प्रकाश बारबिंड व वाजीद भाई यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now