शहापूर | मुंबई–नाशिक महामार्गावर आटगावजवळ रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. या घटनेने स्थानिक परिसरात हादरा बसला आहे. विशेषत: निधन पावलेल्या एका तरुणाचे लग्न काही दिवसांवर आलेले असताना, त्याच दिवशी कुटुंबीयांना दशक्रिया करावी लागणार असल्याने वातावरण शोकाकुल झाले आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
तरुणांच्या स्वप्नांवर पाणी, कुटुंबीयांचा आक्रोश
या अपघातात मृत्यू झालेल्यांपैकी जयेश शेंडे हा घरातील एकुलता मुलगा होता. कुटुंबाने त्याच्यावर अनेक स्वप्ने ठेवली होती. घरचा आधारवड गमावल्याने शेंडे कुटुंब पूर्णपणे कोलमडले आहे. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे त्यांच्या आयुष्यात अंधार पसरला आहे.
साखरपुड्यानंतर काहीच दिवसात मृत्यूचे वृत्त
दुसरा मृत्यू पावलेला तरुण मयूरेश चौधरी याच्या कुटुंबावर तर दुहेरी आघात झाला. काही दिवसांपूर्वीच त्याचा साखरपुडा झाला होता. २ डिसेंबरला त्याचे लग्न ठरले होते. घरात लग्नाचा उत्साह, तयारीची लगबग, पत्रिका वाटप — सर्व काही सुरू होते. पण एका अपघाताने सर्व आनंदाचे क्षण दु:खात परिवर्तित झाले
ज्या दिवशी घरात मंगलाष्टके घुमणार होती, त्या दिवशीच कुटुंबियांना दशक्रिया विधी करायची वेळ आली आहे. चौधरी कुटुंबीयांना हा धक्का सावरत नाहीये.
गंभीर जखमी युवकावर उपचार सुरू
या अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
मुंबई–नाशिक महामार्गावर वारंवार होणारे अपघात आणि त्यात होणारी जीवितहानी यामुळे नागरिकांनी प्रशासनाने अधिक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे.
या दुःखद घटनेने दोन तरुणांचे आयुष्य संपले आणि दोन कुटुंबांवर अपरिमित दु:खाचा डोंगर कोसळला आहे.