पती व दोन मुली गंभीर जखमी

तेलगाव–धारूर मार्गावर घडलेल्या भीषण अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील अग्निशामक दलाच्या वाहनाने दिलेल्या धडकेत जखमी झालेल्या कुसुम विष्णू सुदे (30) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी तब्येत सतत बिघडत गेल्याने लातूर येथील रुग्णालयात त्यांचे निधन झाले. या घटनेने सुदे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट

२२ नोव्हेंबरची घटना
अजित पवार परतूरहून औसा दिशेने प्रचारसभेसाठी जात असताना धूनकवड फाटा परिसरात त्यांच्या ताफ्यातील अग्निशामक दलाच्या गाडीने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. दुचाकीवर सुदे दाम्पत्य आणि त्यांच्या दोन मुली—रागिणी (9) व अक्षरा (6)—होत्या. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की दुचाकीचा चेंदामेंदा झाला आणि चारही जण रस्त्यावर फेकले गेले.
स्थानिकांनी तत्काळ धाव घेत जखमींना धारूर ग्रामीण रुग्णालयात पोचवले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना त्वरित लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. कुसुम सुदे यांच्या डोक्यासह शरीरावर गंभीर जखमा असल्याने डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली; पण अखेर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
कुटुंब उध्वस्त, उपचार सुरू
कुसुम यांच्या निधनाने दोन लहान मुली आणि पतीवर मोठे संकट कोसळले आहे. विष्णु सुदे आणि दोन्ही मुलींच्यावर अद्यापही उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी अशी प्रार्थना स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
ताफ्याच्या गाड्यांच्या वेगावर प्रश्नचिन्ह
या हृदयद्रावक अपघातानंतर ताफ्यातील वाहनांचे वेग, नियमपालन आणि सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मोठ्या ताफ्यांच्या धावापळीत सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होतो, याची पुन्हा एकदा जाणीव करून देणारी ही घटना ठरली आहे. स्थानिकांकडून या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
अचानक आलेल्या या दुर्घटनेने परिसरात हळहळ, संताप आणि दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.