Best FD Rates : एका वर्षाच्या एफडीवर कोणती बँक देते सर्वाधिक व्याज? जाणून घ्या सविस्तर

Spread the love

मुंबई :
शेअर बाजार, म्युच्युअल फंड आणि इतर या गुंतवणुकी म्हणजे जोखीम आलीच गुंतवणुकींच्या तुलनेत अजूनही बरेच जण गुंतवणूकदार आपली बचत मुदत ठेवीत (FD) मध्ये ठेवण्याला जास्त प्राधान्य देतात. हमी परतावा, जोखीम मुक्त स्वरूप आणि नियोजनबद्ध उत्पन्न मिळते यामुळेच FD हा गुंतवणुकीचा सोपा आणि लोकप्रिय पर्याय आहे. विशेषत: अल्पकालीन आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी एक वर्षाची FD अनेकांसाठी आदर्श देखील मानली जाते.

मात्र, प्रत्येक बँक आपला वेगळा व्याजदर देत असल्याने योग्य बँक निवडल्यास परतावा अधिक वाढवता येऊ शकतो. 5 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या Bank Bazaar कडून मिळालेल्या आकडेवारीच्या आधारे, कोणत्या बँकेकडून एका वर्षाच्या मुदत ठेवीवर सर्वाधिक व्याजदर मिळतो ते पाहूया.


एका वर्षासाठी सर्वोत्तम खाजगी बँका

इंडसइंड बँक – 7% व्याजदर
👉 1 लाख रुपयांची गुंतवणूक एका वर्षानंतर 1,07,000 रुपये होईल.

कोटक महिंद्रा बँक, अ‍ॅक्सिस बँक आणि HDFC बँक – 6.60% व्याजदर
👉 1 लाख रुपयांची गुंतवणूक 1,06,600 रुपयांपर्यंत वाढेल.

ICICI बँक – 6.40% व्याजदर
👉 1 लाख रुपयांची FD एका वर्षानंतर 1,06,400 रुपये होईल.

एका वर्षासाठी सर्वोत्तम सार्वजनिक बँका

बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक – 6.60% व्याजदर
👉 1 लाख रुपयांची गुंतवणूक 1,06,600 रुपयांपर्यंत वाढेल.

कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया – 6.50% व्याजदर
👉 1 लाख रुपयांची गुंतवणूक 1,06,500 रुपयांपर्यंत होईल.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) – 6.40% व्याजदर
👉 1 लाख रुपयांची गुंतवणूक एका वर्षानंतर 1,06,450 रुपये होईल.

गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा सल्ला

जर तुम्हाला अल्पकालीन FD हवी असेल तर सध्या इंडसइंड बँक सर्वाधिक परतावा देत आहे (7%) पण, फक्त व्याजदर पाहूनच निर्णय घेऊ नका. बँकेची विश्वासार्हता, FD वर उपलब्ध सुविधा या देखील पाणी गरजेचे आहे आधीची ग्राहकसेवा यांचा विचार करूनच गुंतवणूक करणे शहाणपणाचं ठरते

एका वर्षासाठी FD करायची असल्यास इंडसइंड, कोटक, अ‍ॅक्सिस, HDFC आणि बँक ऑफ बडोदा/PNB या बँका सध्या गुंतवणूकदारांना अधिक आकर्षक परतावा देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *