MHADAहक्काचं घर घ्यायची सुवर्णसंधी : पुण्यासह चार शहरांत म्हाडाची बंपर लॉटरी, आवश्यक कागदपत्रांची माहिती

Spread the love

मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी घर मिळवण्याची म्हाडा कडून मोठी सुवर्णसंधी पुन्हा एकदा उपलब्ध झालेली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने (MHADA) पुणे, पिंपरी, सांगली आणि सोलापूर या चार जिल्ह्यांत मिळून एकूण 6,168 घरांची बंपर लॉटरी जाहीर केली आहे.

म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील  यांची माहिती

कुठे किती घरे मिळणार ?

पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये – एकूण 1,500 घरे

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात – एकूण 1,500 घरे

पीएमआरडीए क्षेत्र – 1,114 घरे

सांगली आणि सोलापूर जिल्हा – उर्वरित घरे

या सोडतीत एकूण 1,683 घरे प्रथम प्राधान्य तत्त्वावरील आहेत, 299 घरे पंतप्रधान आवास योजनेतून दिली जाणार आहेत, तर उर्वरित घरे ही सामाजिक आणि सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतून उपलब्ध होणार आहेत. ऑगस्ट महिन्यातील सोडतीत विक्री न झालेली तब्बल 1,300 घरे यावेळी पुन्हा सामील करण्यात आली आहेत.

अर्ज करण्याची प्रक्रिया आणि तारीख

अर्ज आणि अनामत रक्कम जमा करण्यास सुरुवात झालेले आहे

अर्जाची भरण्याची अंतिम मुदत : 31 ऑक्टोबर 2025

अर्जदारांची प्रारूप यादी : 11 नोव्हेंबर 2025

हरकती व दावे नोंदवण्याची अंतिम तारीख : 13 नोव्हेंबर 2025

अंतिम यादी जाहीर : 17 नोव्हेंबर 2025

लॉटरी सोडत : 21 नोव्हेंबर 2025

म्हाडा अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

1. आधार कार्ड – अर्जदाराचे तसेच पती/पत्नीचे (मोबाईल नंबर आधारला लिंक असणे आवश्यक).

2. पॅन कार्ड – अर्जदार व पती/पत्नीचे.

3. रहिवासी प्रमाणपत्र / वास्तव्याचा पुरावा

4. महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)

5. उत्पन्नाचा दाखला – आयकर भरत असल्यास आयकर रिफंड सर्टिफिकेट.

6. जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र – आरक्षित प्रवर्गासाठी आवश्यक.

7. विशेष आरक्षित प्रवर्गासाठी प्रमाणपत्रे – पत्रकार, कलाकार, राज्य/केंद्र सरकार कर्मचारी, स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, आमदार-खासदार आदींसाठी.

सर्व कागदपत्रे डिजिलॉकर किंवा संबंधित प्राधिकरणाकडून सही करून अपलोड करणे बंधनकारक आहे.

नागरिकांसाठी दिलासा

परवडणाऱ्या किमतीत घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या हजारो नागरिकांसाठी ही सोडत मोठा दिलासा ठरणार आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रियेच्या सोयीबरोबरच पारदर्शकता राखण्यासाठी डिजिलॉकरच्या वापरावर भर देण्यात आला आहे

म्हाडाच्या या  सोडत मध्ये घर घेण्यासाठी इच्छुकांनी 31 ऑक्टोबरपूर्वी अर्ज पूर्ण करावा, आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करावीत ही नंबर योजना सर्वसामान्य माणसासाठी व फायदेशीर ठरणार आहे ज्यांना घर नाही त्यांचे घराचे स्वप्न हे पूर्ण होणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *