दररोजची धावपळ, तणाव आणि बदललेली जीवनशैली यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. पोटावर चरबी वाढणे, चेहऱ्यावर पिंपल्स येणे, थकवा जाणवणे अशा समस्या जवळजवळ प्रत्येकालाच भेडसावत आहेत. अनेकदा आपण या त्रासांवर उपाय शोधण्यासाठी महागडी उत्पादने, डिटॉक्स ड्रिंक्स किंवा उपचारांचा आधार घेतो, पण अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. प्रत्यक्षात, काही साध्या आणि नैसर्गिक सवयी अंगीकारल्या तरी शरीर व मनावर मोठा बदल दिसू शकतो.
तज्ज्ञांच्या मते, सकाळच्या दिनचर्येत काही छोटे पण प्रभावी बदल केले, आणि ते सातत्याने २१ दिवस पाळले, तर पोट हलके राहते, त्वचा अधिक उजळते आणि मन प्रसन्न राहते. पाहूया अशा कोणत्या पाच गोष्टी आहेत ज्या दिवसाची सुरुवात वेगळी बनवू शकतात.
रात्री ६-८ काळे मनुके आणि दोन धागे केशर कोमट पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी उठल्यावर ते पाणी प्यावे आणि मनुके खावेत. हा उपाय शरीरातील रक्त शुद्ध करतो, आयर्नची कमतरता कमी करतो आणि त्वचेला नैसर्गिक तेज देतो. हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठीही हा उपाय उपयुक्त ठरतो. पचन सुधारल्यामुळे पोट हलके राहते आणि चरबी कमी होण्यास मदत होते.
उठल्यानंतर कपालभाती आणि 4-7-8 ब्रीदिंग एक्सरसाईजचा समावेश करा. रोज फक्त एक मिनिट कपालभाती आणि तीन राउंड श्वसन व्यायाम केले तरी शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतो. त्यामुळे पेशींना ऊर्जा मिळते, मेटाबॉलिझम वेगवान होते आणि ताणतणाव कमी होतो. मानसिक शांततेसह ताणामुळे वाढणारी पोटाची चरबीही कमी करण्यास मदत मिळते.
३) अंघोळीपूर्वी ड्राय ब्रशिंग
फक्त एका मिनिटासाठी मऊ ब्रशने शरीरावर हलके वरच्या दिशेने स्ट्रोक करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारते, त्वचेला टाईटनेस मिळतो आणि लिम्फॅटिक सिस्टीम सक्रिय होते. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात, सूज कमी होते आणि त्वचा अधिक टवटवीत दिसते.
पचनक्रिया सुधारण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी साधा एन्झाइम शॉट घ्या. यासाठी अर्धा कप पपई, एक चमचा चिया बिया आणि चिमूटभर काळी मिरी ब्लेंड करून घ्या. हे मिश्रण गॅस-फुगवटा टाळते, आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि सूज कमी करण्यास मदत करते. त्यामुळे त्वचाही निरोगी राहते.
५) जर्नलिंगची सवय
शारीरिक आरोग्याइतकाच मानसिक आरोग्याचा विचार करणेही गरजेचे आहे. सकाळी दोन मिनिटे डायरी लिहा—एखादी आभारी असलेली गोष्ट, दिवसाचे एक ध्येय आणि हसण्याचे एक कारण नोंदवा. या छोट्या सवयीमुळे मूड सुधारतो, हॅपी हार्मोन वाढतात आणि भावनिक खाण्याची सवय कमी होते.
आरोग्य सुधारण्यासाठी महागडे उपाय किंवा क्लिष्ट पद्धतींची गरज नाही. नैसर्गिक, साध्या पण सातत्याने केलेल्या छोट्या कृतींचाही मोठा परिणाम होऊ शकतो. पुढील २१ दिवस या पाच गोष्टींचा सकाळच्या दिनचर्येत समावेश करा आणि स्वतःमध्ये जाणवणारा सकारात्मक बदल अनुभवून पाहा.
टीप : ही माहिती केवळ जनजागृतीसाठी आहे. कोणत्याही आरोग्याशी संबंधित त्रासासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.