Namo Shetkari नमो शेतकरी महासन्मान निधी : सातवा हप्ता लवकरच, पात्र शेतकरी २ मिनिटांत ऑनलाइन तपासू शकतात स्टेटस

Spread the love

Agriculture News राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेचा सातवा हप्ता पुढील काही दिवसांत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. सरकारकडून हप्त्यांच्या वितरणाची तयारी सुरू असून सध्या एफटीओ (Fund Transfer Order) जनरेट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हप्ता मिळणार की नाही, हे जाणून घेणे सोपे झाले आहे.

आपला हप्ता मिळणार का? असे तपासा

शेतकऱ्यांनी सर्वप्रथम NSMNY या अधिकृत वेबसाइटवर जावे.

तेथे Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करावे.

लॉगिनसाठी नोंदणी क्रमांक, आधारशी जोडलेला मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक – हे तीन पर्याय दिलेले असतात.

निवडलेला क्रमांक टाकून कॅप्चा कोड भरावा.

पुढे Get Aadhaar OTP या बटणावर क्लिक करावे.

मोबाईलवर आलेला ओटीपी टाकल्यानंतर आपला Beneficiary Status दिसून येईल.

या स्टेटसमध्ये शेतकऱ्याचे नाव, नोंदणी क्रमांक, मोबाईल नंबर आणि आतापर्यंत मिळालेल्या हप्त्यांचा तपशील दिसतो. जर Eligibility Details असा पर्याय दिसला तर शेतकरी पात्र आहे, परंतु Ineligibility असा पर्याय दिसल्यास शेतकरी अपात्र आहे आणि कारण देखील दाखवलेले असेल.

एफटीओ जनरेट झाला आहे का?

हप्ता मिळणार आहे का याची खात्री करण्यासाठी PFMS (Public Financial Management System) पोर्टल वापरता येते.

पोर्टलवर गेल्यानंतर Payment Status → DBT Status Tracker हा पर्याय निवडावा.

पुढे Category मध्ये DBT NSMNYS Portal निवडावे.

त्यानंतर Payment वर क्लिक करून नोंदणी क्रमांक टाकावा.

कॅप्चा भरून Submit केल्यावर एफटीओची माहिती समोर येईल.

जर एफटीओ जनरेट झाला असेल तर तो स्पष्टपणे दिसेल. एफटीओ नसेल तर फक्त जुन्या हप्त्यांचीच माहिती दिसेल. अशा वेळी नवीन हप्ता मिळणार नाही किंवा शेतकरी अपात्र आहे, असे समजावे.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला

ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो आहे त्यांनी नियमितपणे आपला Beneficiary Status आणि एफटीओ स्टेटस तपासावा. त्यामुळे हप्ता वेळेत खात्यात जमा होणार आहे का हे आधीच समजू शकेल.

सातवा हप्ता मिळाल्यानंतर लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. विशेषतः अतिवृष्टीमुळे किंवा नैसर्गिक संकटामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी ही आर्थिक मदत मोठा आधार ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *