वडवणी तालुक्यात टायगर ग्रुपच्या 11 शाखांचे थाटामाटात उद्घाटन

Spread the love

सामाजिक कार्यासाठी सदैव तत्पर राहणार” – अजित गालफाडे

वडवणी |
वडवणी तालुक्यातील ग्रामीण भागात सामाजिक कार्याची भक्कम पायाभरणी करण्यासाठी टायगर ग्रुप ही संघटना गावागावांमध्ये झेपावत आहे. याच धर्तीवर तालुक्यातील विविध खेडेगावांमध्ये टायगर ग्रुपच्या तब्बल 11 शाखांचे भव्यदिव्य उद्घाटन जल्लोषात पार पडले.

या उद्घाटन सोहळ्यास टायगर ग्रुप ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष पै. डॉ. तानाजी भाऊ जाधव, मराठवाडा अध्यक्ष मा. पै. गोरक्षक उमेश भाऊ पोखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन टायगर ग्रुप बीड जिल्हा अध्यक्ष मा. पै. राकेश अण्णा जाधव, जिल्हा उपाध्यक्ष मा. श्री. अतुल भाऊ कारंडे यांनी केले. अध्यक्षस्थानी टायगर ग्रुप वडवणी तालुका अध्यक्ष मा. श्री. अजित अण्णा गालफाडे होते.

उद्घाटन प्रसंगी तालुक्यात स्थापन झालेल्या शाखांचा परिचय करून देण्यात आला. त्यामध्ये –

देवळा (बु) : शाखाप्रमुख – संग्राम रेडे, उपप्रमुख – दत्ता कदम

उपळी : शाखाप्रमुख – ईश्वर राठोड, उपप्रमुख – अशोक सावंत

तिगाव तांडा : शाखाप्रमुख – गणेश चव्हाण, उपप्रमुख – प्रदीप चव्हाण

चिंचोटी तांडा : शाखाप्रमुख – प्रवीण राठोड, उपप्रमुख – राहुल राठोड

राजा हरिश्चंद्र पिंपरी तांडा : शाखाप्रमुख – विकास पवार, उपप्रमुख – करण राठोड

याशिवाय इतर गावांमध्येही शाखा स्थापन होत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. टाळ्यांच्या गजरात झालेल्या या उद्घाटन सोहळ्यामुळे संपूर्ण वडवणी तालुका टायगर ग्रुपच्या कार्याने भारावून गेला.

आपल्या भाषणात तालुका अध्यक्ष अजित गालफाडे म्हणाले, “टायगर ग्रुप ही संघटना केवळ नावापुरती नाही, तर ती प्रत्येक सामान्य माणसाच्या हक्कासाठी लढणारी संघटना आहे. वडवणी तालुक्यातील सामाजिक समस्यांवर काम करून प्रत्येक गावात एकता, बांधिलकी आणि सेवा या तत्त्वांवर टायगर ग्रुप काम करणार आहे.”

संपूर्ण कार्यक्रमात उत्साह, ऐक्य आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *