टेंबे चरणी पावणेदोन किलो चांदीचे दागिने अर्पण

Spread the love

भक्तांची लक्षणीय गर्दी

भाविकांनी वही, पेन देण्याचे आवाहन

माजलगाव :
माजलगावचा महाराजा म्हणुन ओळख असलेल्या टेंबे गणपतीची स्थापना उत्साहात
करण्यात आली असुन पहिल्याच दिवशी भाविकांनी पावणेदोन किलो चांदीचे दागिने श्रीचरणी अर्पण केले आहेत तर
भक्तांची लक्षणीय उपस्थिती दिसुन येत आहे. दररोज महाप्रसादाचे वाटप करण्यात येत आहे तर भाविकांनी हार, तुरे न


आणता श्रीचरणी वही, पेन अर्पण करावेत असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष अनंतशास्त्री जोशी यांनी केले आहे.

गणेशोत्सव काळात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता महिलांकरीता स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे तर तीन
दिवसीय गणेश यागास सुरूवात झाली आहे. गाणगापुर येथील दत्त मंदिराचा व तिरूपात बालाजीचा आकर्षक देखावा
मंडळाच्या वतीने साकारण्यात आला आहे. त्याचबरोबर पाच दिवस महिलांचा भजनाचा कार्यक्रम, सामूहिक अथर्वशीर्ष
पठण, पौर्णिमेला दिपोत्सव, आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर आदी उपक्रमांची रेलचेल गणेशोत्सव काळात असणार


आहे. राज्यासह मराठवाड्यातुन टेंबे गणपतीच्या दर्शनाला भाविकांची मोठी रिघ आहे. स्थापनेच्या पहिल्या दिवशी
गणरायाला पावणे दोन किलो चांदीचे दागिने श्रीचरणी अर्पण करण्यात आले आहेत. यामुळे मुर्तीची अधिक शोभा वाढली
आहे. यामध्ये भारती व्दारकादास मुंदडा यांचे वतीने सोंड, डॉ. आर. जी. बजाज यांचे वतीने हात, सचिन बजाज, गिरीष
बजाज यांचे वतीने कान तर हातातील कंगन सचिन श्रीकांत रूद्रवार यांचे वतीने देण्यात आले तर चांदीचे मोदक, दुर्वा
देखिल श्रीचरणी अर्पण केल्या आहेत. भाविकांनी हार, तुरे न आणता श्रीचरणी वही, पेन अर्पण करावेत असे आवाहन
मंडळाचे अध्यक्ष अनंतशास्त्री जोशी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *