GST News : GST चे दोन स्लॅब रद्द; सर्वसामान्यांना दिलासा, अनेक वस्तू होणार स्वस्त!

Spread the love

देशभरातील सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. गुंतागुंतीचा वाटणारा GST करसिस्टम आता थोडा साधा होणार आहे. आतापर्यंत अस्तित्वात असलेले 12 टक्के आणि 28 टक्के करस्लॅब रद्द करण्यात आले असून आता केवळ दोन मुख्य स्लॅब – 5 टक्के आणि 18 टक्के – राहणार आहेत. हा नवा निर्णय 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहे.

दिल्ली येथे पार पडलेल्या GST परिषदेच्या 56 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीचे अध्यक्षस्थान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भूषवले होते. पत्रकार परिषदेत माहिती देताना त्यांनी सांगितले की, “सर्वसामान्य माणूस हा आमच्या धोरणांच्या केंद्रस्थानी आहे. शेतकरी, मजूर आणि सर्वसामान्य ग्राहक यांचा विचार करून कररचना सोपी करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व राज्यांनी या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे.”


कोणकोणत्या वस्तू होणार स्वस्त?

या निर्णयामुळे अनेक वस्तूंवरील करकपात होऊन त्या ग्राहकांना स्वस्त मिळणार आहेत.

शून्य टक्के GST (Zero GST Slab):

UHT दूध

पनीर

पिझ्झा ब्रेड

रोटी, पराठा
म्हणजेच दैनंदिन वापरातील काही खाद्यपदार्थांवर आता कोणताही GST लागणार नाही.

5% GST:

शॅम्पू, साबण, तेल

नमकीन (फरसाण, चिवडा)

पास्ता, नूडल्स, कॉफी
यामुळे घरगुती खर्चाचा थोडा भार हलका होणार आहे.

18% GST (पूर्वी 28%):

टीव्ही

कार आणि बाईक

सिमेंट
या महागड्या वस्तूंवर पूर्वीच्या तुलनेत कमी कर लागणार आहे.

जीवनावश्यक औषधे:
33 औषधांवरील GST रद्द करण्यात आला आहे. यामध्ये कर्करोगावरील तीन औषधांचाही समावेश आहे


40% स्लॅब – लक्झरी आणि हानिकारक वस्तूंसाठी

सरकारने एक खास 40 टक्क्यांचा सुपर-लक्झरी स्लॅब ठेवला आहे. यामध्ये

पान मसाला

सिगरेट, बिडी, गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ

फ्लेवर्ड कार्बोनेटेड पेय
या वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.


सर्वसामान्यांचा दिलासा

जीएसटी स्लॅब्स सोपे केल्याने सर्वसामान्यांसाठी वस्तू अधिक परवडणाऱ्या होण्याची शक्यता आहे. विशेषतः खाद्यपदार्थ, दैनंदिन वापरातील वस्तू आणि औषधांवरील कर कमी झाल्याने ग्राहकांना थेट फायदा मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *