माजलगाव धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; 3 दरवाजा मधून 5919 क्युसेक पाणी सोडले , नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Spread the love

माजलगाव :
माजलगाव धरण क्षेत्रात पावसामुळे पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे धरण प्रशासनाने आज शुक्रवार दि. 29 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 10 वाजल्यापासून सांडव्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या वेळेस सिंधफणा नदीपात्रात सुमारे 5919 क्युसेक पाणी सोडले जाणार आहे.

धरणात येणाऱ्या पाण्याचा वेग आणि प्रमाण लक्षात घेऊन हा विसर्ग पुढील तासांमध्ये कमी-जास्त करण्यात येऊ शकतो, अशी माहिती कार्यकारी अभियंता, माजलगाव पाटबंधारे विभाग, परळी यांनी दिली आहे.

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सिंधफणा व गोदावरी नदीपात्रात कोणत्याही नागरिकांनी प्रवेश करू नये. तसेच नदीकाठावरील गावे आणि शेतकरी यांनी आवश्यक ती खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

पाण्याच्या प्रवाहामुळे जीवित वा वित्तहानी होऊ नये, यासाठी सर्व नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *