भरपावसात खा.बजरंग सोनवणे मनोज जरांगे यांच्या भेटीला

Spread the love

मराठा आरक्षणला दिला जाहीर पाठिंबा; पाठिंबा देणारे राज्यातील पहिले लोकप्रतिनिधी

बीड:
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आज आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. यावेळी भर पावसात खा.बजरंग सोनवणे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षण लढ्याला जाहीर पाठिंबा दिला. आपण दादासोबत आहोत, अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी यावेळी माध्यमाना दिली.

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत मराठा आरक्षण आंदोलन सुरु झालं आहे. दोन दिवसांपासून राज्यातील मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. दि.२९ रोजी आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू झाले आहे. दरम्यान सकाळ पासून जोरदार पाऊस सुरू आहे. परंतु पडत्या पावसात मराठा समाज रस्त्यावर आहे. खा.बजरंग सोनवणे यांनी देखील पडत्या पावसात आझाद मैदानात जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या सरकारने मान्य कराव्यात अशी मागणी देखील केली. खा.बजरंग सोनवणे यांनी सर्वात पहिली भेट दिली. बजरंग सोनवणे मैदानात येताच मराठा समाजाने त्यांचे प्रचंड जल्लोषात त्यांचे स्वागत केले. आंदोलनाला राज्यातील भेट देणारे पहिले लोकप्रतिनिधी ठरले आहेत. खासदार बजरंग सोनवणे यांनी उघड भूमिका घेतली असून जरांगे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *