माजलगाव धरण ८५.२६ टक्के भरले ; कोणत्याही क्षणी सिंदफणा नदी पात्रात पाणी सोडण्याची शक्यता

Spread the love

माजलगाव |

माजलगाव धरण परिसरात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस होत असल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला आहे. आज शुक्रवार (दि. 29 ऑगस्ट 2025) रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत धरणामध्ये पाणीसाठा 85.26 टक्क्यांवर पोहोचला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात आवक सुरू असून, धरण कोणत्याही क्षणी पूर्ण क्षमतेने भरू शकते.

हवामान खात्याने पुढील काही दिवसांत अतिवृष्टीचा इशारा दिलेला असल्याने, धरण व्यवस्थापनाकडून अतिरिक्त पाणी सिंदफणा नदीपात्रात सोडावे लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

काय होणार पुढे?
धरणातील पाणीसाठा ठरावीक मर्यादेपेक्षा वाढल्यास अधिकचे पाणी सोडले जाईल. यामुळे सिंदफणा आणि गोदावरी नदीकाठच्या गावांना महसूल विभाग आणि स्थानिक यंत्रणांनी सावधानतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

उपविभागीय अभियंता (जा.प्र. टप्पा-२, उपविभाग क्र. १७, केसापुरी वसाहत) यांच्या पत्रातून ही माहिती तहसीलदार, तहसील कार्यालय, माजलगाव यांना कळविण्यात आली आहे.

नागरिकांना सूचना

नदी, नाले व पुलावरून पाणी वाहत असल्यास धोका घेऊ नये

नदीकाठच्या भागातील नागरिकांनी सतर्क राहावे

शेतकऱ्यांनी आपले जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावीत

यंत्रणांकडून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्यात येत असून, धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील आवक वाढतच राहिल्यास, पाणी सोडण्याचा निर्णय केव्हाही लागू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *