आपण ग्रीन टीचे फायदे वारंवार ऐकतो – वजन कमी करण्यापासून हृदय व कॅन्सरपासून संरक्षणापर्यंत. पण हा ग्रीन टी आपल्यापर्यंत आला तरी कसा? त्याचा इतिहास नक्की काय सांगतो?

चहा – हजारो वर्षांचा प्रवास
चहा हे जगातील सर्वात जुने व लोकप्रिय पेय आहे. कॅमेलिया सायनेन्सिस (Camellia sinensis) या झाडाच्या पानांपासून बनणाऱ्या या पेयाला अनेक रूपं आहेत. त्याचाच एक आरोग्यदायी प्रकार म्हणजे ग्रीन टी. भारतात आज तो उच्च व मध्यमवर्गीयांच्या स्वयंपाकघरात सहज दिसतो. एक कप ग्रीन टी मनाला ताजेतवाने करतो आणि मेंदूची कार्यक्षमता वाढवतो.

ग्रीन टीची उत्पत्ती
ग्रीन टी चीनच्या संस्कृतीत उदयाला आला, असं मानलं जातं. दंतकथेनुसार, इ.स.पूर्व २७३७ मध्ये चिनी सम्राट शेन नंग यांच्या समोर गरम पाण्यात काही पाने पडली आणि त्यातून तयार झालेलं पाणी त्यांनी चाखलं. त्याची चव त्यांना इतकी आवडली की, ग्रीन टीचा जन्म तिथूनच झाला. पुढे इ.स. ३५० मध्ये चहाच्या प्राशनाचा पहिला उल्लेख आढळतो.
- Weather Alert: या जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता ; 24 जिल्ह्यांना अलर्ट
- Central Government Alert केंद्रा कडून ; सर्व राज्यांना पत्र 20 दिवसांत ॲक्शन प्लॅन तयार करण्याचे आदेश
- ZP Election जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर ; कोणत्या जिल्ह्याला कोणतं आरक्षण?
- Weight Lose सकाळी करा ही ५ कामे; पोटाची चरबी कमी होईल
- Nano Banana AI वापरून काही मिनिटांत 3D फोटो कसा बनवायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
चीनमध्ये सुरू झालेला हा चहा नंतर जपान, मध्य-पूर्व आशिया आणि अखेर संपूर्ण जगभर पसरला.

उत्पादन प्रक्रिया
ग्रीन टी कॅमेलिया सायनेन्सिसच्या पानांपासून बनतो. ग्रीन टी तयार करताना पाने कमी प्रमाणात ऑक्सिजनला (किण्वन) सामोरी जातात. त्यामुळेच त्याचा रंग, चव आणि औषधी गुणधर्म जतन होतात.
सर्वप्रथम पाने हाताने तोडली जातात, नंतर त्यांना हलकं चर्वण करून वाळवण्याची प्रक्रिया केली जाते. ऑक्सिजनच्या प्रमाणानुसार त्याची चव बदलते.

चीन ते भारताचा प्रवास
चीनच्या फुजियान भागातील पर्वतीय प्रदेश ग्रीन टीसाठी प्रसिद्ध आहेत. वाईट, उलॉंग यांसारखे इतर प्रकारही तिथेच बनतात.
- Weather Alert: या जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता ; 24 जिल्ह्यांना अलर्ट
- Central Government Alert केंद्रा कडून ; सर्व राज्यांना पत्र 20 दिवसांत ॲक्शन प्लॅन तयार करण्याचे आदेश
- ZP Election जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर ; कोणत्या जिल्ह्याला कोणतं आरक्षण?
- Weight Lose सकाळी करा ही ५ कामे; पोटाची चरबी कमी होईल
- Nano Banana AI वापरून काही मिनिटांत 3D फोटो कसा बनवायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
भारतात ग्रीन टीचा इतिहास १८१५ पासून सुरू होतो. आसाम दौऱ्यावर गेलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी चहाच्या झाडाकडे लक्ष दिलं. तेव्हा स्थानिक लोक त्याला काबाईल पेय म्हणत. नंतर १८३५ मध्ये गव्हर्नर लॉर्ड बेंटिकने चहाचे उत्पादन सुरू करण्याचे आदेश दिले आणि आसाममध्ये चहाच्या बागा फुलल्या. दार्जिलिंगचा ग्रीन टी तर आज “भारतीय शाम्पेन” म्हणून जगभर ओळखला जातो.
आजचे प्रमुख उत्पादक
ग्रीन टीचे सर्वाधिक उत्पादन आशियात होते. चीन हा सर्वात मोठा उत्पादक असून त्यानंतर जपान आणि इंडोनेशियाचा क्रमांक लागतो. चीनचे ड्रॅगनवेल, गन पावडर, स्नोवी माऊंटन जियान हे प्रकार जगप्रसिद्ध आहेत. जपानमधील मचा, सेंचा, कुकीचाही तितकीच लोकप्रिय नावे आहेत.
आरोग्याशी नाते
ग्रीन टीला औषधी गुणधर्मांमुळे जगभर मान मिळतो. नियमित सेवनाने वजन नियंत्रणात राहते, हृदय रोगापासून बचाव होतो आणि कॅन्सरच्या रुग्णांनाही त्याचा लाभ होतो, असे संशोधनातून दिसून आलं आहे. जपानमध्ये तर जेवणासोबत ग्रीन टी पिण्याची परंपराच आहे.
चीनच्या डोंगररांगांतून सुरू झालेला ग्रीन टी आज जगभर आरोग्य आणि ताजेपणाचं प्रतिक बनला आहे. प्रत्येक कपात इतिहासाचा अंश, निसर्गाची ताकद आणि आरोग्याचा संदेश दडलेला आहे.