माजलगाव धरणातील जलसाठा 82.79 टक्क्यांवर

Spread the love

माजलगाव –
29 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 6 वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार माजलगाव धरणातील पाणीपातळीत समाधानकारक वाढ झाली आहे. सध्या धरणाची पाणीपातळी 431.09 मीटर असून कमाल पातळी 431.80 मीटर इतकी आहे.

धरणाची एकूण क्षमता 454.00 दशलक्ष घनमीटर (Mm³) असून, आतापर्यंत 400.30 Mm³ पाणी साठले आहे. त्यापैकी 258.30 Mm³ हा जिवंत साठा असून तो एकूण क्षमतेच्या 82.79 टक्के आहे. गेल्या वर्षी याच दिवशी धरणात एकही दशलक्ष घनमीटर जिवंत साठा नव्हता, ही बाब विशेष महत्त्वाची ठरते.

यंदा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आजवर 609 मिमी पाऊस झाला असून, केवळ आजच्या दिवशी 18 मिमी पाऊस नोंदवला गेला आहे. आतापर्यंत धरणात 245.314 Mm³ पाण्याचा एकूण विसर्ग झाला असून, यामध्ये केवळ आजच्या दिवसात 29.038 Mm³ इतका पाण्याचा ओघ आला आहे.

सध्या धरणातून पाणी विसर्ग (स्पिलवे डिस्चार्ज) सुरू नाही. धरणाखालील परिसर सुरक्षित असून, पुढील दिवसांत पावसाच्या तीव्रतेनुसार पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *