!! मी जीव लावण्या केवळ जन्मा आले !! समाज सेविका व गझलकारा ममता सिंधुताई सपकाळ

Spread the love

!! रोटरी क्लब ॲाफ माजलगाव सिटी ची पदग्रहण सोहळा थाटात संपन्न !!

माजलगाव :
मी सुद्धा एक रोटरियन आहे . सेवा एकता व चांगुलपणा ही तर खरी रोटरी आहे . समाजाने नाकारलेल्याना स्वीकारणे खुप अवघड असते .
!! मी जीव लावण्या केवळ जन्मा आले !!
या ममता सिंधुताई सपकाळ यांच्या विचारांनी खचाखच उपस्थितीने भारावलेल्या राजस्थानी मंगल कार्यालय मोहरले.


रोटरीक्लब ॲाफ माजलगावच्या पदग्रहण सोहळ्यातील प्रकट मुलाखतीत त्या बोलत होत्या.
प्रमुख उपस्थिती सहायक प्रांतपाल कल्याण कुलकर्णी यांची होती.
मान्यवरांनी तुळशी रोपास पाणी घालुन व दिपप्रज्वलनाने कार्यक्रम सुरूवात झाला.
नुतन अध्यक्ष रो. विनोद बजाज यांनी रविंद्र कानडे यांच्या कडुन तर नुतन सचिव रो. दिगंबर महाजन यांनी रो. लता जोशी यांच्या कडुन पदभार स्वीकारला तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. प्रोजेक्ट चेअरमन रो. दामोदर संदीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.


ओघवते प्रास्ताविक रो. कानडे यांनी केले. कल्याण कुलकर्णी यांनी आपले मनोगत व नुतन कार्यकारिणीस शुभेच्छा दिल्या. नविन अध्यक्ष रो. विनोदकुमार बजाज यांनी पुढील वर्षभराचे संकल्प मनोगतात सांगितले.
सन्मती बाल निकेतनला सहाय्य , पर्यावरण पुरक पिशवी वाटप , रोटरी बुलेटिन चे प्रकाशन , प्रारंभिक सुत्र संचालन करणारे रो. निरंजन वाघमारे यांच्या इंग्रजी पुस्तकांचे प्रकाशन , पालक पॅांईट प्रझेंटेशन या भरगच्च उपक्रमातून रोटरी क्लब ॲाफ माजगाव सिटी चा भारदस्तपणा नजरेत भरला.
रो. दिगंबर महाजन यांनी आभार प्रदर्शन केले.

माजलगावकरांसाठी एक मंतरलेली अशी ममता सिंधुताई सपकाळ यांची मुलाखत साहित्यिक रो. प्रभाकर साळेगावकर यांनी घेतली.
पाच संस्थांच्या कार्य , आव्हाने ,ममता ताईंचे बालपण , पद्मश्री स्व. सिंधुताई यांचा संघर्ष ऐकताना अनेकदा पापण्या ओलावल्या .


साळेगावकर म्हणाले माई म्हणायच्या भाषण नाही तर रॅशन नाही तसं ममता जी तुम्हा साठी एक स्लोगन आहे
“सोबती मी घेतली गझल
चालत राहु मजल दर मजल”
यावर ममताताई व उपस्थित लोकांनी मस्त दाद दिली .
खुमासदार चपखल प्रश्न व तितकीच अफलातून उत्तरे , दर्जेदार एकसेबढकर एक गझल यामुळे मुलाखतीचा दीड तास कसा गेला कळलेच नाही.
समारंभास विकास उमापुरकर , प्रविण देशपांडे , सुनिल जोशी,जयस्वाल , अशोक बजाज , रो. सुरेश भानप ,डॅा. शंकर जुजगर , विनोद जाधव , महेश कोठुळे , विनय सिंधुताई सपकाळ , शशिकिरण गडम , रूपाली कचरे , लक्ष्मीनारायण मुंदडा ,डॅा. स्वानंद कुलकर्णी , डॅा.अर्चना पवार , राजेश देशपांडे , गौरी देशमुख स्नेहल पाठक , विनायक रत्नपारखी,रामेश्वर टवाणी , अरूणकाका गोसावी,बळीराम यादव यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

रो. सुरेश भानप , डॅा. अर्चना मोरे , सुशील लोढा , गणेश गवारे , सुरेखा गवळी , स्मिता लिमगावकर , जगदिश साखरे ,अंजली अकोलकर , पंडित तिडके बी. एस. देशपांडे , श्रीकृष्ण शेजुळ , राहुल लंगडे संदीप गुंडेवार , वर्षा भोसले , डॅा. राधाकिसन डाके. , दिपक देशमुख , श्रेयस देशपांडे , गोपाळ कुलकर्णी
आदीनी परिश्रम पुर्वक असे उत्कृष्ट व देखणे नियोजन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *