लोकांची सेवा करणाऱ्यांना संधी मिळायला हवी – पप्पू कागदे
केज येथील रिपाईंच्या संकल्प मेळाव्याच्या माध्यमातून पप्पू कागदे यांनी फुंकले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे रणशिंग
केज :
निळ्या झेंड्याखाली शोषित पीडित लोकांची सेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी द्यायला हवी.
केंद्रिय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या

- Weather Alert: या जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता ; 24 जिल्ह्यांना अलर्ट
- Central Government Alert केंद्रा कडून ; सर्व राज्यांना पत्र 20 दिवसांत ॲक्शन प्लॅन तयार करण्याचे आदेश
- ZP Election जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर ; कोणत्या जिल्ह्याला कोणतं आरक्षण?
- Weight Lose सकाळी करा ही ५ कामे; पोटाची चरबी कमी होईल
- Nano Banana AI वापरून काही मिनिटांत 3D फोटो कसा बनवायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
नेतृत्वाखाली चळवळीत काम करणारा कार्यकर्ता हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी बांधिलकी जपणारा कार्यकर्ता आहे. म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दीपक कांबळे यांच्या उमेदवारीवर पप्पू कागदे यांनी जणू शिक्का मोर्तब करून स्थानिक स्वराज्य संस्थेचे रणशिंग फुंकले. तसेच यावेळी मेळाव्याचे संयोजक दीपक कांबळेंनी यांनी यावेळी सांगितले की, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि पप्पु कागदे यांच्या नेतृत्वाखाली बहुजन समाजाला सोबत घेऊन सामाजिक अभिसरण सुदृढ करण्याची प्रक्रिया आणि सामाजिक चळवळ गतिमान कर कार्यकर्ते सोबत घेऊन आम्ही त्यांच्या मूलभूत हक्कासाठी लढत आहोत.
दि. २५ ऑगस्ट रोजी केज रिपाइंचे वतीने दीपक कांबळे यांनी केज येथील मुक्ताई लॉन्स येथे संकल्प मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला मराठवाडा संघटक मजहर खान, मराठवाडा संघटक गोवर्धन वाघमारे, जिल्हा सल्लागार उत्तम मस्के, प्रभाकर चांदणे, दशरथ सोनवणे, कपिल कागदे, रवींद्र जोगदंड, विकास मस्के, ईश्वर सोनवणे, राहुल सरवदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

- Weather Alert: या जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता ; 24 जिल्ह्यांना अलर्ट
- Central Government Alert केंद्रा कडून ; सर्व राज्यांना पत्र 20 दिवसांत ॲक्शन प्लॅन तयार करण्याचे आदेश
- ZP Election जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर ; कोणत्या जिल्ह्याला कोणतं आरक्षण?
- Weight Lose सकाळी करा ही ५ कामे; पोटाची चरबी कमी होईल
- Nano Banana AI वापरून काही मिनिटांत 3D फोटो कसा बनवायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
या संकल्प मेळाव्याला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पप्पू कागदे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकीच्या माध्यमातून उपेक्षित आणि सामन्यांच्या कामासाठी अहोरात्र मदतीसाठी रस्त्यावर असलेल्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी. तसेच निळ्या झेंड्याच्या माध्यमातून सेवा करण्याची अशा कार्यकर्त्यांना समाजाने संधी देण्याचे आवाहन करीत अप्रत्यक्षरित्या त्यांनी दीपक कांबळे यांच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तंब करून एक अर्थाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. तसेच पुढे बोलताना कागदे यांनी रिपाइं चळवळीच्या मध्यातून आणि रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यातील ५ हजार एकर जमीन ही भूमिहीन अतिक्रमण धारकांना मिळवून दिली असून ३ हजार भूमिहीनांना त्याच्या सात बारा मिळवून देण्याचे काम केले आहे. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी कार्यकर्ते काम करीत असतात. रामदास आठवले यांनी राज्याचे समाज कल्याण मंत्री असताना त्यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा प्रश्न सोडविला. त्यासाठी त्यांनी त्यांचे मंत्रीपद देखील डावावर लावले. त्यामुळे तत्कालीन सरकारला विद्यापीठाचे नामांतर करण्याचा निर्णय घ्यावा लागला. रिपाइंच्या माध्यमातून दलीत, शोषित, पीडित समाजाला न्याय देण्याचे काम कार्यकर्ते निस्वार्थीपणे काम करीत असल्याचा उल्लेख केला.
यावेळी संकल्प मेळाव्याच्या संयोजक दीपक कांबळे यांनी प्रस्ताविक करताना सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार समाजाभिमुख करण्यासाठी आणि सामाजिक चळवळ गतिमान करण्यासाठी रामदास आठवले आणि पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहोत. उपेक्षित आणि बहुजन समाजाला न्याय मिळून देण्यासाठी काम करीत असल्याचा देखील त्यांनी उल्लेख केला. तसेच गायरान जमिनी, स्मशानभूमी, घरकुल आणि विविध सरकारी योजना यात कुणाची अडवणूक होत असेल तर त्यासाठी आम्ही अहोरात्र संघर्ष करून समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम कार्यकर्त्याच्या माध्यमातून करीत असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
संकल्प मेळावा यशस्वी करण्यासाठी
गौतम बचुटे, दिलीप बनसोडे, ईश्वर सोनवणे, विकास मस्के, रमेश निशिगंध, गौतम बचुटे, निलेश ढोबळे, राजेश सोनवणे, सुरज काळे, बाळासाहेब ओव्हाळ, प्रशांत हजारे, अनिता वाघमारे, सुरेखा गायकवाड, सरस्वती शिनगारे, विकास आरकडे, भारत गायकवाड, मिलिंद भालेराव, कैलास जावळे, हरीश गायकवाड, दादाराव धेंडे, अंबादास तुपारे, रुपचंद ढालमारे, इब्राहिम इनामदार, शेख मौला, जयपाल रोकडे, प्रदिप शिनगारे, नितीन घोडके, हरेंद्र धीरे, डॉ.चत्रभुज हिरवे, मसु बचुटे, विनोद गायकवाड, रवींद्र तुपारे, संभाजी हजारे, विनोद शिंदे, रोहित बचुटे, राहुल बचुटे, आदींनी केले आहे. कार्यक्रमाचे संचलन दिलीप बनसोडे यांनी तर आभार गौतम बचुटे यांनी व्यक्त केले.
आता निळ्या झेंड्याखाली काम करणाऱ्या चळवळीतील कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला संधी मिळायला हवी – पप्पू कागदे
पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी आंबेडकरी अनुयायींची फौज निर्माण झाली आहे. त्याच्या माध्यमातून लढवय्या कार्यकर्ता तयार होणे गरजेचे आहे.
– मजहर खान
अनेक वर्ष पासून केज मतदार संघ राखीव आहे परंतु आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली हे दुर्दैव आहे. त्यासाठी आता आपली ताकद कार्यकर्त्यांनी निर्माण करावी.
-प्रभाकर चांदणे
बहुजन आणि उपेक्षित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि राजकीय सत्तेच्या खुर्चीवर बसविण्यासाठी रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली पप्पू कागदे काम करीत आहेत.
— दीपक कांबळे
गुणवंत विद्यार्थ्यांचा केला गुणगौरव :-
या संकल्प मेळाव्यात दहावी आणि बारावीला विशेष प्राविण्य घेतलेल्या विद्यार्थ्यांसह पोलिस दलात भरती झालेल्यांचांचा आणि उच्च शिक्षणं घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात