Mumbai Latur Vande Bharat Express : आता मुंबई-लातूर वंदे भारत धावणार; कुठे कुठे थांबणार गाडी ? किती वेळ लागणार गाडीला ?

Spread the love

लातूरकरांसाठी आनंदाची बातमी वंदे भारत एक्सप्रेस सुरू

मुंबई-लातूर वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच धावणार !

प्रवासाचा कालावधी कमी, व्यवसाय आणि पर्यटनाला चालना

Photo Wikipedia

Latur Mumbai Vande Bharat Express देशामध्ये वंदे भारत एक्स्प्रेसच्या फास्ट रेल्वेसेवेचं जाळं उभं राहत आहे. सुसाट वेग आणि आधुनिक सोयी सुविधांमुळे ही एक्स्प्रेस प्रवाशांसाठी लोकप्रिय ठरत आहे. नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसनंतर आता मराठवाड्याच्या लातूरकरांसाठी देखील आनंदाची बातमी आहे. लवकरच मुंबई ते लातूर वंदे भारत एक्स्प्रेस (Mumbai Latur Vande Bharat Express) मार्गावर धावणार असून, प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाचणार आहे.

प्रवासासाठी किती वेळ लागणार ?

  • मुंबई ते लातूर हे साधारण ५२५ किलोमीटर अंतर
  • रस्तेमार्गे प्रवास: ११-१२ तास
  • पारंपरिक एक्स्प्रेस ट्रेन: साधारण ९.३० तास
  • वंदे भारत एक्स्प्रेस: केवळ ७ ते ७.३० तास

सीएसएमटीवरून (CSMT) सकाळी ६ वाजता निघणारी ही गाडी लातूरला दुपारी १ ते १.३० वाजेपर्यंत पोहोचेल. म्हणजेच प्रवाशांना वेगवान, आरामदायी आणि वेळेची बचत करणारा पर्याय उपलब्ध होणार आहे.

कोणकोणत्या स्टेशनांवर थांबे?

मुंबई-लातूर वंदे भारत एक्स्प्रेसचे थांबे पुढीलप्रमाणे असतील:

लातूर हा मराठवाड्यातील महत्त्वाचा जिल्हा असून, अनेक ऐतिहासिक, धार्मिक आणि शैक्षणिक वैशिष्ट्यांनी समृद्ध आहे.

धार्मिक स्थळं:

सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिर, अष्टविनायक मंदिर, सूरत शहवली दर्गा यांसारखी प्राचीन ठिकाणं.

व्यवसाय:

लातूर हे देशातील सर्वात मोठं सोयाबीन केंद्र मानलं जातं. वंदे भारतमुळे मुंबई बाजारपेठेपर्यंत पोहोचणं अधिक सोपं होणार आहे.

शिक्षण:

शिक्षणामध्ये”लातूर पॅटर्न” हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेला आहे , विद्यार्थ्यांना आधुनिक रेल्वेसेवेचा आता लाभ मिळणार आहे.

तज्ज्ञांच्या मते, वंदे भारत एक्स्प्रेसमुळे लातूरला पर्यटन, शिक्षण आणि उद्योगधंद्यांच्या दृष्टीने मोठा फायदा होणार आहे. दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या लातूरला आता मुंबईशी थेट वेगवान रेल्वेसेवेने जोडल्यामुळे विकासाची नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *