कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा
12 व्या ते 20 व्या हप्त्यांपर्यंतची प्रलंबित रक्कम जमा होणार थेट खात्यात
देशातील लाखो शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून (PM Kisan Samman Nidhi Yojana) मोठी खुशखबर आली आहे. आतापर्यंत ज्यांचे हप्ते काही कारणास्तव थांबले होते, अशा शेतकऱ्यांना आता थेट 18,000 रुपयांचा लाभ मिळू शकतो. कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी सांगितले की, आवश्यक कागदपत्रे आणि पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना 12 व्या ते 20 व्या हप्त्यांपर्यंतची थकबाकी रक्कम एकाचवेळी दिली जाणार आहे.

- Weather Alert: या जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता ; 24 जिल्ह्यांना अलर्ट
- Central Government Alert केंद्रा कडून ; सर्व राज्यांना पत्र 20 दिवसांत ॲक्शन प्लॅन तयार करण्याचे आदेश
- ZP Election जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर ; कोणत्या जिल्ह्याला कोणतं आरक्षण?
- Weight Lose सकाळी करा ही ५ कामे; पोटाची चरबी कमी होईल
- Nano Banana AI वापरून काही मिनिटांत 3D फोटो कसा बनवायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
थांबलेले हप्ते आता एकत्रित मिळणार
योजनेच्या सुरुवातीपासून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये तीन हप्त्यांत देण्याची तरतूद केली होती. पण काही शेतकऱ्यांची पडताळणी वेळेत पूर्ण न झाल्याने त्यांचे 12 व्या हप्त्यानंतरचे पैसे अडकले. आता सरकारने स्पष्ट केलं आहे की, जर शेतकऱ्यांनी सर्व औपचारिकता पूर्ण केल्या तर 12 व्या ते 20 व्या हप्त्यांपर्यंतची रक्कम म्हणजेच तब्बल 18,000 रुपये एकाचवेळी खात्यात जमा होणार आहेत. या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
योजनेतील बदलांमुळे हप्ते अडकले
पीएम किसान योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी गेल्या काही वर्षांत सरकारने महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यामध्ये आधार सीडिंग, ई-केवायसी, जमिनीच्या नोंदींशी जोडणी आणि आधारशी जोडलेली पेमेंट प्रणाली यांचा समावेश आहे.
12 व्या हप्त्यासाठी जमिनीच्या नोंदी जोडणे आवश्यक होते
13 व्या हप्त्यासाठी आधार आधारित पेमेंट प्रणाली लागू करण्यात आली
15 व्या हप्त्यासाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली
या औपचारिकता वेळेत पूर्ण न केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे हप्ते थांबले. विशेषत: ज्या राज्यांत पडताळणीस विलंब झाला तिथे मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना अडचण भासली.
पडताळणीची प्रक्रिया सोपी
रामनाथ ठाकूर यांनी स्पष्ट केले की, शेतकऱ्यांनी फारशा क्लिष्ट प्रक्रियेत जाण्याची गरज नाही. काही सोप्या स्टेप्स पूर्ण केल्यावर थकलेली रक्कम थेट खात्यात जमा होईल.
1. पीएम-किसान पोर्टलवर लॉगिन करा
2. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा
3. आधार क्रमांक व बँक खाते लिंक असल्याची खात्री करा
4. जमिनीच्या नोंदी अपडेट करा
5. रेशन कार्डसह इतर कागदपत्रांची पडताळणी करा
ही सर्व टप्पे पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात प्रलंबित 18,000 रुपये जमा होणार आहेत.
फसवणूक रोखण्यासाठी कडक पावले
योजनेतून अपात्र लोकांनी लाभ घेऊ नये यासाठी सरकारने तांत्रिक बदल केले आहेत. पीएम-किसान पोर्टल आता सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (PFMS), आधार डेटाबेस, आयकर विभाग आणि रेशन कार्ड डेटाबेसशी थेट जोडले गेले आहे. यामुळे डुप्लिकेट खाती, मृत शेतकऱ्यांची खाती तसेच अपात्र लाभार्थ्यांची नावे आपोआप वगळली जात आहेत. यामुळे फसवणुकीवर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण आले आहे.
शेतकरी संघटनांची टीका
दरम्यान, भारतीय किसान युनियन (लखोवाल गट) चे अध्यक्ष हरिंदर सिंह लखोवाल यांनी सरकारच्या या धोरणावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, सरकारची ही पद्धत शेतकऱ्यांशी अन्याय करणारी आहे. “प्रथम ग्रामीण विकास निधी थांबवण्यात आला आणि आता शेतकऱ्यांची थेट आर्थिक मदतही अडकवली जात आहे,” अशी टीका त्यांनी केली.
20 वा हप्ता जाहीर
याचदरम्यान, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2 ऑगस्ट 2025 रोजी पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता जाहीर केला. यावेळी देशभरातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2,000 रुपये जमा करण्यात आले. त्यामुळे अजूनही ज्यांचे हप्ते थांबले आहेत, त्यांनी तातडीने कागदपत्रांची पडताळणी करून 18,000 रुपयांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे.