रानभाज्याचे माणसाच्या आहारात अन्य साधारण महत्व – आ.प्रकाशदादा सोळंके

Spread the love

कृषी कार्यालयाच्या राणभाजी मोहोत्सवास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद

माजलगाव :

रानभाज्याची आपल्या आहारात समावेश केल्यामुळे आपले आरोग्य अबाधित राखले जाते असे प्रतिपादन आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी पंचायत समिती माजलगाव येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय माजलगाव यांनी काल दि १८ ऑगस्ट २०२५ रोजी

आयोजित केलेल्या रानभाजी महोत्सव मध्ये केले. रानभाजी महोत्सव चा उद्घाटन आमदारश्री प्रकाशदादा सोळंके यांच्या हस्ते करण्यात आले. पुढे बोलताना रानभाज्या नैसर्गिकरित्या आपल्या शेतशिवारामध्ये उपलब्ध होत असून त्यावर कसल्याही प्रकारच्या कीटकनाशकांचा वापर केला जात नाही तसेच या रानभाज्यामध्ये विविध प्रकारचे विटामिन्स.खनिजे, प्रथीने असल्यामुळे आपल्या आरोग्यास लाभदायक असतात या रानबाजासाठी ग्राहक आणि उत्पादक साठी सुविधा उपलब्ध करून दिल्यास अनेकांना फायदा होईल असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री गणेश बादाडे तालुका कृषी अधिकारी माजलगाव यांनी करताना विविध भाज्यांचे महत्त्व आणि त्यांच्या रेसिपी याविषयी माहिती सांगितली श्रीमती श्रद्धा भवारी उपविभागीय कृषी अधिकारी माजलगाव यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना रानभाज्या आणलेल्या शेतकरी,शेतकरी

गट,महिला बचत गटांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून प्रशासक तथा गट विकास अधिकारी माजलगाव श्रीमती ज्योत्स्ना मुळीक आणि पंचायत समितीचे माजी उपसभापती मनसबदार, उपस्थित होते यावेळी श्री जागृत खेडकर मंडळ कृषी अधिकारी माजलगाव,दत्तप्रसाद भोसले मंडळ कृषी अधिकारी गंगामसला,गोपीनाथ पवार तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक माजलगाव अण्णासाहेब जगताप पुरस्कार प्राप्त शेतकरी तसेच कृषी विभागातील सर्व उप कृषी अधिकारी,सहाय्यक कृषी अधिकारी,आत्मा कर्मचारी आणि तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर शेतकरी, पत्रकार उपस्थित होते यावेळी रानभाजी स्टॉल लावलेल्या शेतकऱ्यांमधून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढून त्यांचे प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आले तसेच सर्व सहभागी महिला बचत गट,शेतकरी यांना उत्स्फूर्त सहभाग घेतल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले रामबाजी स्टॉलला शहरातील अनेक शाळेचे व महाविद्यालयाच्या विद्यार्थी यांनी भेट देऊन रानभाज्याचे महत्त्व जाणून घेतले या रानभाजी महोत्सव मध्ये जवळपास ४० प्रकारच्या भाज्या उपलब्ध होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव बापमारे उप कृषी अधिकारी माजलगाव यांनी केले आभार आतिश चाटे मंडळ कृषी अधिकारी केसापुरी यांनी मांनले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *