मराठवाड्यात पावसाचा कहर : मांजरा धरणाचे ४ दरवाजे उघडले

Spread the love

महाराष्ट्रात सध्या सर्व ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लावून धुमाकूळ घातला आहे. त्यातच मराठवाडा, विदर्भ आणि कोकण या भागांमध्ये देखील पावसाचा जोर वाढल्याने अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती देखील निर्माण झाली आहे. नदी-नाले ओसंडून वाहत आहेत त्यामध्ये अनेक गावांचा संपर्क देखील तुटला आहे. स्थानिक प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले.

बीड जिल्ह्यातील मांजरा धरणाचे ४ दरवाजे उघडले

मांजरा धरणाची सद्यस्थिती

बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यातील तब्बल 172 गावांना पाणी पुरवणाऱ्या मांजरा धरणामध्ये सध्या 90 टक्के पाणीसाठा आहे. सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी पातळी वेगाने वाढू लागली आहे सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने धरणाचे चार दरवाजे 0.25 मीटरने उघडून 3,494.28 क्यूसेक्स (सुमारे 98.96 क्यूमेक्स) पाणी नदीपात्रात विसर्ग सुरू केला आहे .

धरणाचे चार दरवाजे उघडल्यामुळे नदीकाठच्या गावांना पूराचा धोका संभवत असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा देखील इशारा देण्यात आला आहे.

सतर्कतेचा इशारा

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगर विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी आदेश काढून लातूर पाटबंधारे विभागामार्फत नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पूर नियंत्रण कक्ष, मांजरा प्रकल्प धनेगाव यांच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले की

प्रशासनाचा इशारा कोणीही नदीपात्रात प्रवेश करू नये.

नदीकाठच्या गावातील लोकांना इशारा देण्यात आलेला आहे की जर पाणी पातळी वाढली आणि घर सोडण्याची वेळ आली तर अधिक घर सोडण्यात यावे

कोणतीही जिवीत किंवा वित्तहानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी.

गेल्या चार दिवसांपासून सतत होत असलेल्या पावसामुळे आगामी काही दिवसांत परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता देखील प्रशासनाने व्यक्त केली आहे.

हिंगोलीत मधील कयाधू नदी धोक्याच्या पातळीवर

हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. शेवाळा आणि आसपासच्या गावांत नदीचे पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. जिल्हा परिषद शाळेतील शालेय पोषण आहार आणि साहित्य पाण्यापासून वाचवण्यासाठी स्थलांतरित करण्यात असून स्थानिक प्रशासनाकडून पूरग्रस्त भागात मदतकार्य देखील सुरू करण्यात आले आहे

वाशिम जिल्ह्यात ढगफुटीचा पाऊस

विदर्भातील वाशिम जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. दुपारनंतर पावसाचा जोर इतका वाढला की किनखेडा, एरंडा, सोनखस, कळंबा महाली अशा अनेक यांसारख्या गावांत ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. गावात पाणीच पाणी साचल्याने अनेक घरांमध्ये पाणी ददेखील घुसले आणि लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही गावांना तलावाचे रूप आले आहे

कोकणामधील जिल्ह्यांची सद्यस्थिती

कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातदेखील पावसाने थैमान घातले असून. परशुराम घाटाखालील पेढे गावात शनिवारी मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले. संतोष देवजी फके यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. स्थानिक ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर दुर्लक्षाचा आरोप केला आहे, पावसाच्या पाण्यामुळे दरवर्षी होणाऱ्या नुकसानीकडे अधिकारी दुर्लक्ष करतात, अशी भावना व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती चिंताजनक आहे. मराठवाड्यात मांजरा धरणाचे दरवाजे उघडल्याने बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. हिंगोली, वाशिम आणि रत्नागिरी जिल्ह्यांतही नागरिकांच्या घरात पाणी घुसले असून मोठे नुकसान झाले आहे.

राज्य प्रशासन आणि पाटबंधारे विभाग नागरिकांना आवाहन करत आहेत परिस्थिती गांभीर्याने घ्या, सुरक्षिततेचे नियम पाळा आणि आवश्यकतेनुसार प्रशासनाशी संपर्क साधा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *