मांजरा धरणावर शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी नेते भाई मोहन गुंड यांच्या हस्ते जलपूजन

Spread the love

केज
दि.१७ : तालुक्यातील मांजरा धरण शनिवारी (दि.१६) दुपारी ३ वाजता शंभर टक्के भरले असून धरणाचे चार ही दरवाजे उघडण्यात आले. या पार्श्वभूमीवर परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने सर्वप्रथम जलपूजन शेतकरी नेते भाई मोहन गुंड यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राहुल खोडसे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे डॉ.उत्तम खोडसे, भाई राचलिंग पाटील, जयराज निशिगंध, राहुल सावंत, शाम खोडसे, संतोष चव्हाण, अशोक चोपने, रामधन सोमवंशी, अतुल गुजर, अशोक हंडीबाग, पप्पू पाटील, पत्रकार रंजीत घाडगे, यश हाजारे आदींची उपस्थिती होती. जलपूजनानंतर पेढे वाटप करून शेतकऱ्यांनी “इडा पिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे” अशा पारंपरिक घोषणा देत मोठा आनंदोत्सव साजरा केला. मांजरा धरण भरल्यामुळे तालुक्यातील पिकांना दिलासा मिळणार असून पाण्याचा प्रश्न ही मोठ्या प्रमाणात सुटण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *