Hurricane Erin: धोक्याची रात्र! तब्बल 160 किमी वेगाने येतंय महातुफान, हवामान विभागाचा हाय अलर्ट

Spread the love

हवामान विभागाचा हाय अलर्ट , अटलांटिक महासागरात Hurricane Erin वादळाचा धोका

नागरिकांना बाहेर न पडण्याच्या सूचना

मुंबई | 16 ऑगस्ट 2025 –
अरबी समुद्र आणि पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढील काही दिवस हवामानात मोठे बदल दिसून येणार आहेत. त्याचवेळी, अटलांटिक महासागरात निर्माण झालेल्या हुरिकेन एरिन (Hurricane Erin) वादळाने वेग घेतला आहे. सध्या हे वादळ ताशी जवळपास 100 किमी वेगाने हे वादळ पुढे सरकत असून येणाऱ्या काही तासांत ते तब्बल 160 किमी प्रतितास वेगाचे व अतितीव्र येण्याचा संभाव्य धोका आहे

हवामान विभागाचा इशारा
सावध राहण्याची गरज

भारतीय हवामान विभागाने असे म्हटले आहे की, समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे किनाऱ्यालगतच्या राज्यांमध्ये पुढे ७ दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. वाऱ्यांचा वेग अचानक वाढल्याने आणि दिशा बदलल्याने संकट जवळ येत असल्याचे देखील संकेत हवामान विभागाने दिले आहेत

नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना

नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडावे अन्यथा बाहेर जाणे सहसा टाळावेच

एरिन वादळाचा मार्ग

अमेरिकेच्या राष्ट्रीय चक्रीवादळ केंद्राने (NHC) दिलेल्या माहितीनुसार –

एरिन वादळ लीवर्ड बेटांच्या उत्तरेकडे सरकत आहे.

अँगुइला, सेंट मार्टिन, सेंट बार्थेलेमी, साबा, सेंट युस्टाटियस आणि सिंट मार्टिन या बेटांवर हे वादळ २४ तासांत उष्णकटिबंधीय वादळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते

या वादळाचा परिणाम प्यूर्टो रिको, व्हर्जिन आयलंड, टर्क्स अँड कैकोस आणि आग्नेय बहामास पर्यंत जाण्याची शक्यता देखील आहे

हवेचा वेग वाढतोय तेही धोकादायक
पद्धतीने

शुक्रवारी रात्री ८ वाजेपर्यंत वाऱ्यांचा वेग 85 किमी प्रतितास होता.

रात्री ११ वाजेपर्यंत तो 100 किमी प्रतितास झाला.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार हा वेग जवळपास 160 किमी प्रतितास पर्यंत होऊ शकतो

अमेरिकेवर ही धोका

हवामान तज्ज्ञांच्या मते सध्या तरी एरिन वादळ दक्षिण फ्लोरिडा पासून दूर राहील. परंतु, फ्लोरिडा ते न्यू इंग्लंड आणि अटलांटिक कॅनडा पर्यंतच्या किनाऱ्यांवर मोठ्या लाटा आणि धोकादायक रिप करंट्स दिसू शकतात.

जास्त पावसामुळे भूस्खलन होण्याचा देखील धोका

तज्ज्ञांच्या मते –

एरिन प्यूर्टो रिकोच्या उत्तरेला जाताना आणखी धोकादायक होण्याची शक्यता

रविवारपर्यंत प्यूर्टो रिको आणि व्हर्जिन आयलंडमध्ये ढगफुटीसारखा पाऊस होण्याची शक्यता आहे.

जोरदार वाऱ्यांमुळे भूस्खलनाचा धोका निर्माण होऊ शकतो.

सध्याचे हवामान 18 वादळ येण्याची शक्यता

अटलांटिक वादळ हंगामात एकूण 18 वादळं तयार होऊ शकतात, त्यापैकी 5 ते 9 वादळं प्रचंड चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही आठवडे हवामानाच्या घडामोडींवर काटेकोर लक्ष ठेवण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना

नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यांवर जाणे टाळावे

हवामान विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे

अधिकृत अपडेट्सवर विश्वास ठेवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *