दिल्लीतील निवडणूक आयोगाविरोधातील मोर्चात बीडचे खा.सोनवणे आघाडीवर

Spread the love

महाराष्ट्रात मतदानाच्या आदल्यादिवशी मतदार यादीत नावे सामाविष्ठ केली: खा.सोनवणे

लोकशाही टिकवण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी इंडिया आघाडी एकत्र उभी आहे. ही लढाई लोकशाही वाचविण्यासाठी असून आम्ही ती शेवटपर्यंत लढणार आहोत.

खा.बजरंग सोनवणे, बीड.

बीड: मतचोरी प्रकरणी दि.११ ऑगस्ट रोजी इंडिया आघाडीच्या ३०० खासदारांनी संसदेचे मकरद्वार ते निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत काढलेला मोर्चा दिल्ली पोलीसांनी आडविला. दरम्यान, या खासदारांमध्ये देशाचे नेते शरद पवार, राहूल गांधी, खा.सुप्रिया सुळे यांच्या खांद्याला खांदा लावून बीडचे खा.बजरंग सोनवणे आघाडीवर होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात देखील मतदानाच्या आदल्या दिवशी मतदार यादीत नावे, समाविष्ठ केली जात होती, असा खळबळजनक आरोप केला.


इंडिया आघाडीच्या ३०० खासदारांनी संसदेचे मकरद्वार ते निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यास सुरुवात केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी अडवला. खासदारांनी हातामध्ये ‘सेव्ह व्होट’चे बॅनर घेतले होते. तथापि, दिल्ली पोलिसांनी सांगितले होते की इंडिया आघाडीने या मोर्चासाठी कोणतीही परवानगी घेतली नाही. बिहारमधील मतदार यादीतील अनियमिततेच्या आरोपावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ३०० विरोधी खासदारांनी दिल्लीत पायी मोर्चा काढला आहे. या मोर्चात बीडचे खासदार बजरंग सोनवणे आघाडीवर होते. तर संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा १६ वा दिवस असून लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच विरोधी खासदारांनी गोंधळ सुरू केला. खासदारांनी ‘वुई वॉन्ट जस्टिस’च्या घोषणा देत सभागृहाच्या वेलमध्ये पोहोचले. यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी लोकसभा दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केली. लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सकाळी ११ वाजता सुरू झाले. लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू असताना विरोधकांनी ‘आम्हाला न्याय हवा आहे’ अशा घोषणा दिल्या. यावेळी माध्यमांशी बोलताना खा.बजरंग सोनवणे म्हणाले, इंडिया आघाडीचा मोर्चा निवडणूक आयोगावर आहे. मात्र, याआधी पोलीस बळाचा वापर करण्यात येत आहे. निवडणूक आयोगाला राहूल गांधींवर बोलण्याचा आधिकारी नसून कायदा हा निवडणूक आयोगाच्या घरचा नाही. त्यांनी भाजपसाठी काम करणे सोडावे. निवडणूक आयोग भाजपची बी टिम असल्याचा उल्लेखही खा.सोनवणे यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *