बीड :
हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियानांतर्गत “हरित बीड” मोहिमेला जिल्ह्यात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या अभियानाचा शुभारंभ मा. पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत खंडेश्वरी मैदान, बीड येथे पार पडला.

या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे एकाच दिवशी बीड जिल्ह्यात ३० लाख वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे, तर वर्षभरात तब्बल एक कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट आहे

🌱 वृक्ष लागवड उपक्रमाची रचना:
वन विभाग – 10 लाख रोपे
सामाजिक वनीकरण विभाग – 5 लाख
जिल्हा परिषद – 5 लाख
तुती लागवड – 3 लाख
कृषी विभाग – 2 लाख
नगरपालिका – 1.5 लाख
वन्यजीव विभाग – 75 हजार
पोलीस विभाग – 50 हजार
इको बटालियन – 50 हजार
इतर यंत्रणा व स्वयंसेवी संस्था – 1.75 लाख
वड, पिंपळ, कडुनिंब, आंबा, सिसू, करंज, शेवगा, जास्वंद आदी स्थानिक प्रजातींचा यात समावेश आहे.
संपूर्ण उपक्रमात QR कोड, जिओ टॅगिंग आणि ड्रोनद्वारे छायाचित्रण करण्यात येणार असून 12 हजारांहून अधिक प्रशिक्षित मनुष्यबळ सज्ज आहे.
ऊसतोड कामगार कल्याणासाठी विशेष मेळावा :
गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ, पुणे यांच्यामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी खास मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
महत्त्वाचे निर्णय:
योजनेच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन
प्रथमोपचार संच पेटीचे वाटप – जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत कामगार महिलांना
आरोग्यसाथी उपक्रम – एक हजार महिलांची निवड, प्रशिक्षण व प्रथमोपचार संच प्रदान
नवीन टोल फ्री क्रमांक सुरू – स्थलांतरादरम्यान अडचणी सोडवण्यासाठी
कामगारांची 100% नोंदणी – ग्रामपंचायत स्तरावर ओळखपत्र वाटप
नोंदणीकृत कामगारांना मिळणारे शासकीय योजनांचे लाभ:
आयुष्यमान भारत कार्ड
रेशन कार्ड
घरकुल योजना
ई-महसूल व ग्रामविकास विभागाच्या योजना
या सर्व योजना सॅच्युरेशन पद्धतीने राबविण्यात येणार असून, बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी ही एक मोठी आणि सकारात्मक पावले ठरणार आहेत.