तहसील कार्यालयात थेट प्रक्षेपणाद्वारे कार्यक्रम, शेतकऱ्यांसाठी सरकारकडून आर्थिक दिलासा — नमो निधी व ऍग्री स्टॅक योजनेची माहिती
माजलगाव /
येथील तालुका कृषी अधिकारी यांच्या वतीने तहसील कार्यालय माजलगाव येथे काल २ ऑगस्ट रोजी मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी उत्तर प्रदेश येथून प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेच्या २० व्या हप्त्याचे वितरण काल २ ऑगस्ट रोजी कार्यक्रम थेट प्रेक्षणपणाद्वारे शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते

या कार्यक्रमाला माजलगाव विधानसभेचे आमदार श्री प्रकाश दादा सोळंके यांनी यांनी पी एम किसान सन्मान निधी आणि महाराष्ट्र शासनामार्फत दिला जाणारा नमो निधीमुळे शेतकऱ्याची काही प्रमाणामध्ये आर्थिक गरज भागवण्यास मदत होत आहे असे प्रतिपादन केले . पुढे बोलताना या योजनेअंतर्गत कोणतेही पात्र शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नये असे सांगितले कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री गणेश बादाडे तालुका कृषी अधिकारी माजलगाव यांनी केले श्री रुईकर तहसीलदार माजलगाव यांनी ऍग्री स्टॅक योजनेबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली
या कार्यक्रमाला उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री शिवाजी शिंदे,कृषी विभागातील सर्व मंडळ कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी,सहाय्यक कृषी अधिकारीआत्मा कर्मचारी आणि तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गोपीनाथ पवार तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी केले आणि आभार प्रदर्शन श्री आतिश चाटे मंडळ कृषी अधिकारी केसापुरी यांनी मानले